esakal | विकेंड लॉकडाऊनला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोलून बातमी शोधा

Spontaneous response to the weekend lockdown at Talegaon station

कोरोना रुग्णसंख्येवरुन मावळातील हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी सायंकाळनंतर मेडिकल,दवाखाने आणि रुग्णालये वगळता इतर व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद केली.दिलेल्या मुभेनुसार दुग्धालये सकाळी सात ते अकरापर्यंत उघडी होती.

विकेंड लॉकडाऊनला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
sakal_logo
By
गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या विकेंड लॉकडाउनला तळेगाव दाभाडे शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेडिकल, दवाखाने, रुग्णालये, पेट्रोल पंप वगळता इतर सर्व आस्थापने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना रुग्णसंख्येवरुन मावळातील हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी सायंकाळनंतर मेडिकल,दवाखाने आणि रुग्णालये वगळता इतर व्यवसायिकांनी आपापली दुकाने बंद केली.दिलेल्या मुभेनुसार दुग्धालये सकाळी सात ते अकरापर्यंत उघडी होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शुक्रवारी (ता.०९) रात्री सातनंतर नियम आणि वेळ डावलून चालू असलेल्या ७ ते ८ खानावळी आणि हॉटेलचालकांवर पोलिसांनी कारवाई करून चार हजार रुपये दंड केला.तसेच काही जणांवर खटलेही भरण्यात आल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.व्यावसायिक आणि नागरिकांनी स्वतःसह कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी घरात बसून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.

यशवंतनगर परिसरात केवळ बिट मार्शलची गस्त वगळता पोलीस प्रशासनाने अडथळे उभे न केल्यामुळे गतवर्षीच्या कडक लॉकडाऊनच्या तुलनेत विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांची वर्दळ काही प्रमाणात रस्त्यावर दिसून आली. लिंब फाटा, जिजामाता चौक, स्टेशन चौक आदी ठिकाणी वाहनचालक आणि मोकाट फिरणाऱ्यांची पोलीस पथकामार्फत दिवसभर तपासणी चालू होती.नेहमीप्रमाणे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी लाठ्यांचा प्रसादही दिला.

तळेगाव : पोलीस आयुक्तांकडून मध्यरात्री सायकलवरुन लॉकडाउनचा आढावा

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नवलाख उंबरे,इंदोरी,माळवाडीसह चाकण मार्गावर गस्त चालू होती.तळेगाव चाकण मार्गासह औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतूक सुरळीतपणे चालू होती.तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जनरल हॉस्पिटलमधील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरळीतपणे चालू होते.

सलून दुकानांत चिकन अन् कापड दुकानांत भाजीपाला!

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची अंमलबजावणी आणि प्रतिबंधक मोहिमेवर नियुक्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामही सुरळीतपणे चालू असून,कोरोनाचा संसर्ग रोखण्याकामी नागरिकांसह व्यवसायिकांनी नियमांचे पालन करत यापुढेही असाच प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी केले आहे.