esakal | बारामतीत मैत्रीण सदराचे महिलांकडून उत्स्फूर्त स्वागत....
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती - सकाळ माध्यम समूहाच्या मैत्रीण स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होताना बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह इतर मान्यवर महिला भगिनी.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सकाळ व अँग्रोवन मध्ये आजपासून मैत्रीण सदर सुरु झाले. या निमित्त आज नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष तरन्नूम सय्यद यांच्या उपस्थितीत या सदराची सविस्तर माहिती देण्यात आली.

बारामतीत मैत्रीण सदराचे महिलांकडून उत्स्फूर्त स्वागत....

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सकाळ व अँग्रोवन मध्ये आजपासून मैत्रीण सदर सुरु झाले. या निमित्त आज नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष तरन्नूम सय्यद यांच्या उपस्थितीत या सदराची सविस्तर माहिती देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमामध्ये सहायक वितरण व्यवस्थापक मनोज काकडे यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्येक सहभागी महिलेस हमखास भेटवस्तू मिळणार असून या मुळे वाचनाची आवड वाढण्यासह, अनेक नवीन विषयांवरील माहितीचा खजिनाही खुला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 

63 वर्षांच्या 'तरुणा'ने 75 वेळा केला कात्रज- सिंहगड ट्रेक!

या प्रसंगी अँड. सुप्रिया बर्गे, ज्योती लडकत, संगीता काकडे, वनिता बनकर, अँड. स्नेहा भापकर, आनंदी निबंधे व डॉ. भक्ती महाजन यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वांनीच सकाळच्या माध्यमातून जे विविध उपक्रम सुरु असतात त्याची प्रशंसा करत मैत्रीण या सदरास उत्स्फूर्त प्रतिसाद देणार असल्याचे नमूद केले. 

'आज तुझी विकेट टाकतो' म्हणत टोळक्याचा तरूणावर प्राणघातक हल्ला 

नगरसेविका डॉ.सुहासिनी सातव, ज्योती सरोदे, सुरेखा चौधर, कमल कोकरे, संगीता सातव, सीमा चिंचकर, मयूरी शिंदे, अश्विनी गालिंदे, अनिता जगताप या नगरसेविकांसह, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष वनिता बनकर, तनिष्काच्या प्रमुख ज्योती लडकत, अँड. स्नेहा भापकर, अँड. सुप्रिया बर्गे, आयुष हेल्थ क्लबच्या संगीता काकडे, भाग्यश्री धायगुडे, आनंदी निबंधे, योग महाविद्यालयाच्या डॉ. भक्ती महाजन, पद्मजा फरसोले, रेखा गोरे, शिल्पा खुमकर, सोनाली ठवरे, योगिता जामदार, तनिष्क व्यासपीठा च्या पूनम तावरे, आरती तावरे, नलिनी पवार, वैशाली जगताप, लक्ष्मीप्रभा करे, बबिता जगताप, द्वारका कारंडे आदी उपस्थित होत्या. 

पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग 

सकाळचे योगदान अनन्यसाधारण....
महिलांसाठी सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम नेहमीच राबविले जातात. आताही मैत्रीण सदरातून महिलांना उपयुक्त माहिती मिळणार असून, सोबत अनेक बक्षीसे जिंकण्याचीही संधी मिळेल, महिलांनी या योजनेत सहभागी व्हावे.- पौर्णिमा तावरे, नगराध्यक्षा बारामती नगरपालिका.

Edited By - Prashant Patil