मुंबईला ओव्हरटेक करत पुणे विद्यापीठ ठरलं राज्यात 'एक नंबर'!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

मुंबई विद्यापीठाची स्थापन 1857 मध्ये झाली असून, देशातील सर्वात जुन्या विद्यापीठापैकी हे विद्यापीठ आहे.

पुणे : राज्यातील सर्वात जुने आणि विस्ताराने मोठे विद्यापीठ म्हणून गेले अनेक वर्ष मुंबई विद्यापीठाचा लौकीक होता. पण आता हा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या तब्बल 890 इतकी झाली आहे, तर मुंबई विद्यापीठाशी 823 महाविद्यालये संलग्न आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नाशिक आणि नगर या तीन जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे. फेब्रुवारी 1949 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना होताना केवळ 18 महाविद्यलयांनी नोंदणी केली होती. तेव्हा विद्यार्थी संख्या 8 हजार इतकी होती. गेल्या 70 वर्षात पुण्याला 'विद्येचे माहेरघर' असे विशेषण प्राप्त होत असताना अनेक नामांकित शैक्षणीक संस्था पुणे शहर व इतर भागात उभ्या राहिल्या.

- अजित पवारांच्या कामाचा शिवसेनेच्या मंत्र्याला दणका.. वाचा काय केलंय अजित पवारांनी..

अभ्यासक्रम, गुणवत्ता, उपक्रमाच्या जोरावर देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये पुण्याचा क्रमांक लागतो. सध्या 890 महाविद्यालये असून, स्वायत्त महाविद्यालयांची संख्याही वाढत आहे. गेल्या काही वर्षात पुणे शहरासह पुणे ग्रामीण, नगर व नाशिक येथून पारंपारीक अभ्यासक्रमांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना मोठ्याप्रमाणात परवानगी देण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच विद्यापीठाने 32 महाविद्यालयांना परवानगी देऊन त्यांच्या अंतीम मान्यतेचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले आहेत.

- तानाजी चित्रपटासाठी विद्यार्थ्याने चक्क मुख्यध्यापकांना लिहिले...

मुंबई विद्यापीठाची स्थापन 1857 मध्ये झाली असून, देशातील सर्वात जुन्या विद्यापीठापैकी हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात मुंबई, संपूर्ण कोकण व ठाण्यातील 823 महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कोकण विद्यापीठ सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याने मुंबई विद्यापीठाचा भार कमी होणार आहे.

- ...तरच 'फास्टॅग' असलेल्या वाहनांना 'टोल प्लाझा'वरून मोफत प्रवेश ​

संशोधन आणि गुणवत्तेतही पुढे

संस्थांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ अव्वल झालेले असताना यापूर्वीपासून पुणे विद्यापीठतील विविद विभाग व इतर संस्था संशोधनात आणि गुणवत्तेमध्ये देखील मुंबईच्या तुलनेत चांगले आहेत. त्याच प्रमाणे पुणे विद्यापीठाला कायमच चांगल्या कुलगुरूंची परंपरा लाभली आहे, त्यामुळे या लौकीकात भर पडली आहे, असेही जानकारांचे म्हणने आहे.

''महाविद्यालयांची संख्या वाढली म्हणून विद्यापीठ मोठे होत असले तरी त्यापेक्षा आमच्याकडून गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक निकषांवर प्रयत्न केले जातात. संशोधन व इतर उपक्रमांवर भर दिला जातो. विद्यार्थी, प्राध्यापक यांना आवश्‍यक सुविधा पुरविण्यावर आमचा भर आहे. त्यामुळेच पुणे विद्यापीठाचा देशभरात लौकीक आहे.''
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SPPU overtake to Mumbai University and became number one university in Maharashtra