पुणे : ‘एसआरए’ला जयभवानीनगरमध्ये विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

प्रशासनाला निवेदन
जयभवानी नागरी कृती समितीच्या वतीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे उपजिल्हा अधिकारी यांना पत्र देऊन कळवले आहे, की प्राथमिक सर्वेक्षणासाठी जाहीर प्रकटन अधिकृतरीत्या कोणत्याही नागरिकापर्यंत पोचलेले नाही. त्यामुळे अशा प्रस्तावावर नागरिकांमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही. कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये. राजेंद्र मराठे, जितेंद्र दामोदरे, नितीन शिंदे, बाळासाहेब शिंदे, तात्या कसबे, अक्षय ढमाले, रमेश व्यास, संतोष डोख, हनुमंत मोहोळ आदी रहिवाशांच्या या पत्रकावर सह्या आहेत.

कोथरूड - आपली वस्ती ‘एसआरए’मध्ये जाणार आहे. काही लोक करार (ॲग्रीमेंट) करून घेत आहेत, अशी चर्चा जयभवानीनगरमध्ये पसरल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काहीही झाले तरी आम्हाला ‘एसआरए’मध्ये जायचे नाही, अशी भूमिका या भागातील नागरिकांनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नगरसेविका वैशाली मराठे यांचे पती राजेंद्र मराठे यांनी ‘आपल्याला वाचवायचंय आपल्या हक्काच घर,’ असे स्वतंत्र पत्रक काढल्याने नागरिक अधिक अस्वस्थ झाले आहेत. मराठे यांनी पत्रकात म्हटले आहे, आपल्या भागात काही लोकांनी संगनमत करून एसआरए योजना राबवण्यासाठी रहिवाशांची कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू केले आहे. आपला भाग मेट्रोपासून जवळ असून व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान बनलेला आहे. कोणत्याही कागदपत्रावर सही करू नये. घराची माहिती कोणालाही देऊ नये.

हात सोडून 'बाईक' चालवणे जिवावर बेतले:दोन तरुणांचा मृत्यू 

धुणीभांडी, मजूर काम करणाऱ्या महिला, प्लंबर, रोजंदारी कामगार यांचे निवासस्थान असलेली जयभवानीनगरची वस्ती गजबजलेल्या पौडरस्त्याला लागूनच आहे. मेट्रोमुळे कोथरूडचे महत्त्व वाढले. आता येथील जागेचे महत्त्व वाढले आहे. दहा बाय दहाच्या झोपडीवर आणखी एखादा मजला वाढवून दाटीवाटीने येथे लोक राहतात. अनेकांनी नोटरीमार्फत घरांची खरेदी केलेली आहे. ‘एसआरए’मध्ये आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास येथील रहिवाशांना नाही. ‘एसआरए’च्या नावाखाली आम्हाला येथून हुसकावून लावले जाईल, याची भीती अनेक कुटुंबांना वाटत आहे.

Video : भन्नाट! अशी लग्नपत्रिका पाहिलीच नसेल; एकदा बघाच!

‘एसआरए’ होईल की नाही माहीत नाही; परंतु लोकांचा सहभाग दाखवून एखादी मोठी घरकुल योजना राबवता येईल का? याची शक्‍यताही काही लोक अजमावून पाहत असल्याची चर्चा कोथरूडमध्ये आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SRA oppose in jaybhavaninagar