अरे वा! परप्रांतीय मजुरांसाठी एसटी बस चक्क दारात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 जून 2020

जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे शहर तहसील कार्यालय आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यात येत आहे‌. शहरातील सुमारे चारशे परप्रांतीय मजुरांना मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला जाण्यासाठी 14 एसटी बसेस गुरुवारी सोडण्यात आल्या. ​

पुणे:  लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत असून, सांगवी परिसरात अडकून पडलेल्या नऊ मजुरांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्यासाठी शिवाजीनगर बस डेपोमधून एसटी बस चक्क घरापर्यंत 'धावून' गेली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुणे शहर तहसील कार्यालय आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्यामार्फत परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यात येत आहे‌. शहरातील सुमारे चारशे परप्रांतीय मजुरांना मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला जाण्यासाठी 14 एसटी बसेस गुरुवारी सोडण्यात आल्या. त्यात मध्यप्रदेशला जाणाऱ्या मजुरांसाठी 12 बसेस राज्याच्या सीमेवर असलेल्या गोंदियापर्यंत तर, छत्तीसगडला जाणाऱ्या मजुरांसाठी नागपूरपर्यंत दोन बसेस पाठविण्यात आल्या.

आणखी वाचा - ऐकलंत का? पु.लं. येणार पुन्हा भेटीला
या परप्रांतीय मजुरांना पाठविण्यासाठी मजुरांनी त्यांची नाव नोंदणी तहसील प्रशासनाकडे केली होती. त्यापैकी काही परप्रांतीय मजूर सांगवी परिसरातील होते. त्यांच्या ठेकेदाराने हे मजूर मूळ गावी परत जाऊ नयेत, यासाठी एका खोलीत कोंडून तो पसार झाला होता. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. पुणे शहर तहसीलदार आणि नोडल ऑफिसर तृप्ती कोलते- पाटील यांना ही माहिती मिळाली. यावर त्यांनी सांगवी पोलिसांना कळविले. सांगवी पोलिसांनी या मजुरांची सुटका केली. परंतु तोपर्यंत त्यांची बस निघून गेली होती. या मजुरांना शिवाजीनगर बस डेपोपर्यंत येण्यास कोणते वाहन मिळत नव्हते. तहसीलदार कोलते- पाटील यांनी ही बाब एसटी बस डेपोचे व्यवस्थापक अनिल भिसे यांना सांगितली. त्यावर भिसे यांनी या मजुरांना घेण्यासाठी एसटी बस सांगवी  येथे पाठवली. उलट प्रवास करून ही बस या मजुरांना घेतल्यानंतर इतर काही मजुरांना घेऊन गोंदियाला रवाना झाली.

आणखी वाचा - अन्यथा पंतप्रधान मोदी जबाबदारी असतील; पृथ्वीराज चव्हाण 
''शिवाजीनगर बस डेपोचे अधिकारी आणि 'जनांदोलन'च्या कार्यकर्त्यांच्या मदतीने परप्रांतीय मजुरांना बसने पाठविण्यात आले. त्यासाठी संपूर्ण बस सॅनिटाइझ करण्यात आल्या होत्या. मजुरांना नाश्ता, जेवण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग, मास्क अशी सर्व खबरदारी घेण्यात आली.''
- तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार, पुणे शहर.
 

पुण्यातल्या बनावट नोटांचं मुंबईच्या भेंडीबाजारशी कनेक्शन; लष्कराचा कर्मचारीच सूत्रधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus at door for Outside workers from pune