Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो.... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

पिंपरी : "मातीच्या ढिगाऱ्याखालून आम्ही मजूराला जवळपास पूर्ण बाहेर काढले होते. केवळ त्याचा पाय अडकला होता. त्याला तेथून खेचणार तेवढ्यात मातीचा ढिगारा आमच्या अंगावर पडला. त्या मजूराबरोबरच आम्ही देखील गाडले गेलो, " असा भयानक अनुभव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान सरोश फुंदे यांनी कथन केला. 

पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

पिंपरी : "मातीच्या ढिगाऱ्याखालून आम्ही मजूराला जवळपास पूर्ण बाहेर काढले होते. केवळ त्याचा पाय अडकला होता. त्याला तेथून खेचणार तेवढ्यात मातीचा ढिगारा आमच्या अंगावर पडला. त्या मजूराबरोबरच आम्ही देखील गाडले गेलो, " असा भयानक अनुभव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान सरोश फुंदे यांनी कथन केला. 

पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

सरोश (वय ३२, रा. जाधववाडी) आणि त्यांचे सहकारी फायरमन निखिल गोगावले (वय ३०, रा. शिंदेवाडी, ता. भोर, जि.पुणे ) यांना रविवारी रात्री वैद्यकीय उपचारासाठी जुन्या सांगवी मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची भेट घेतली असता त्यांनी वरील अनुभव कथन केला. 

Video : पुणे : फुगेवाडी दुर्घटनेतील मजूराचा अखेर मृत्यू

फुंदे म्हणाले, "मजूराला वाचविण्यासाठी आमच्या बरोबर आणखी दोघे जण होते. मात्र, ढिगारा पडत असल्याचे लक्षात येताच ते बाहेर पडले. मी त्यातील एकाला बाहेर काढण्याची विनंती केली. मात्र, तो तसाच निघून गेला. आम्ही जवळ पास १ ते दीड तास ढिगारात अडकलो होतो. विशालच्या पाठीवर ढिगारा पडल्याने त्याचे तोंड व पाय मातीत गाडले गेले. "

Video : पुण्यातील फुगेवाडी दुर्घटनेचा असा घडला थरार!

फुंदे म्हणाले, "आम्हाला सायंकाळी ५.३० वाजता मुलगा ढिगारात अडकल्याची वर्दी मिळाली. आम्ही त्याठिकाणी गेलो तेव्हा तेथे २० ते ३० फुटांचा खड्डा खणला गेलेला होता. मजूर गळ्यापर्यंत अडकला होता. त्याचा केवळ पायच बाहेर काढायचा राहिला होता. परंतु, जेसीबीने चुकीच्या पद्धतीने खड्डा खोदला गेला होता. त्यामुळे, माती अंगावर पडली. विशाल याच्या मानेवरच माती पडली होती. मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्याचा फायरसूटही फाटला. पण, चिखलाची माती कठीण झाल्याने तो बाहेर निघू शकला नाही."

निखिल गोगावले म्हणाले, "विशालचा श्वास बंद होत होता. परिस्थिती कठीण असल्याचे जाणवले. पण, आम्ही देखील अडकल्याने काहीच हालचाल करू शकलो नाही. जेसीबी चालकाने खड्डा खालून पोखरल्यामुळे माती अंगावर पडतच होती. बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती. ते सर्व फोटो आणि व्हिडिओ काढण्यात दंग झाले होते. मला बाहेर काढले तेव्हा मी शुद्धीवरच होतो. त्यामुळे, बाहेर चालतच पडलो"

#HealthIssue इनोव्हेशन’वर वर्षभरात एक रुपयाही खर्च नाही

मजूर वेळेवर निघाला असता तर... 

"मजूराला आम्ही जवळपास बाहेर काढले होते. तो बाहेर निघाला असता तर पुढील अनर्थ टळला असता. सगळी माती चिखल, दगडाची होती, असेही फुंदे यांनी सांगितले. 

कामावर कर्तव्य बजावताना मित्र कायम डोळ्यासमोर राहणार

"मी बरे होऊन लवकरच कामावर रुजू होणार आहे. मी कुठल्याही प्रकारे मागे रहाणार नाही. मात्र, ड्युटी असे पर्यंत मित्र विशाल मला डोळ्यासमोर दिसत राहील, "असे सांगताना फुंदे यांचा कंठ दाटून आला होता. दुसऱ्याचा जीव वाचविणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र, या दोघांचे जीव वाचविण्यात यश मिळाले नाही याची खंत सतत वाटत राहील, असे भावूक उदगार फुंदे यांनी काढले. 

#NurseryAdmissions बालवाडी प्रवेशासाठी लाखोंच्या घरात शुल्क

हेल्मेट, फायरसूटमुळे वाचलो

गोगावले म्हणाले, " आम्ही शिडी घेऊन काळजीपूर्वक काम करत होतो. अशा दुर्घटनेचा धसका बसतोच. कामावर रूजू होताना भितीही थोडी फार रहाणार. आमच्या कामात असे अपघात होतच असतात. हेल्मेट, फायरसूटमुळे मी वाचलो. परंतु यात आमचा मित्र दगावला. " 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire brigade officer Sarosh Phunde Talk about Fugewadi Incident