आता कोरोनाला 'स्टॅगर्ड लाॅकडाऊन'चा पर्याय

Staggered lock down option to block corona says experts from Pune University
Staggered lock down option to block corona says experts from Pune University

पुणे : "आर्थिक चक्राला गती द्यायची असले तरी एकदम लाॅकडाऊन काढून सर्वच भाग किंवा कामाचे ठिकाण पूर्ण क्षमतेने सुरू करणे धोकादायक ठरू शकते. त्याऐवजी तीन भागात मनुष्यबळाची विभागणी करून, एक आठवडा एका गटाला प्रत्यक्ष बोलवावे. तीन आठवड्याच्या चक्रात प्रत्येक गटाला १४ दिवस घरून काम करता येऊ शकते. त्यामुळे प्रसारास आळा घालता जाऊ शकतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन तज्ज्ञांनी "इंडिया-सिम" गणितीय प्रतिप्रतिमानातून हा निष्कर्ष काढला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील अनेक राष्ट्रीय संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील तज्ज्ञ एकत्र येऊन "इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड" हा गट तयार केला आहे. त्यात मध्ये एक भाग म्हणून 'कोरोना प्रसाराचे गणिती प्रतिमान' तयार करणे हे आहे. या उपगटात पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशनचे (सीएमएस) डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ. स्नेहल शेकटकर या दोघांचा समावेश आहे. 
 

आपल्या पाल्याच्या करिअरविषयी योग्य मार्गदर्शन; करिअर निवडीची हीच सुवर्णसंधी
लाॅकडाऊन वाढविल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे स्थिती पूर्ववत होत असताना नवी मुंबई, चेन्नई यासह अनेक भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा एक दोन आठवड्यांचा कडक लाॅकडाऊन करावा लागला. 

ज्येष्ठांनो, अशी घ्या काळजी....

डाॅ. पुजारी आणि शेकटकर यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय गटाने "इंड-साय सिम" हे भारतातील रोगप्रसाराचा अभ्यास करण्यासाठीचे गणितीय प्रतिमान विकसित केले. यामध्ये अाकडेवारीचा अभ्यास करून, एकदम लाॅकडाऊन उठविण्यापेक्षा 'स्टॅगर्ड लाॅकडाऊन' मुळे कोरोनाचा प्रसार कमी होऊ शकतो तसेच प्रसार झाला तरी तो ठराविक भागापुरता किंवा गटापुरता मर्यादीत राहू शकतो, अशी मांडणी केली आहे. 

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयाची १२० वर्षांची वाटचाल

स्टॅगर्ड पद्धती म्हणजे काय
कामानिमित्त बाहेर पडणारी लोक आणि घरी थांबणारी लोक अशा विभागणीचा समावेश प्रतिमानात करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवून टाळेबंदी कशी उठवता येईल याचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे. सध्या टाळेबंदी उठवल्यानंतर नवी मुंबई, चेन्नई आदी शहरांमध्ये रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आल्याने पुन्हा टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या प्रतिमानातून असेही दिसून येते आहे की संख्या वाढली की टाळेबंदी करणे यापेक्षा "स्टॅगर्ड" पद्धतीची टाळेबंदी जास्त उपयुक्त आहे. या प्रकारच्या टाळेबंदीमध्ये कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना ३ गटात विभागले जाते. यानंतर प्रत्येक गट एका आठवड्यासाठी कामासाठी बाहेर पडतो आणि बाकी २ गट घरी थांबतात.  यामुळे संसर्ग झालेला व्यक्ती साधारण २ आठवडे बाधित राहत असल्याने तो इतरांना संसर्ग करण्याची शक्यता अत्यंत कमी होते. आणि संसर्ग जरी झालाच तरी तो एका गटापुरताच मर्यादित राहतो असे गणितीय प्रतिमानातून दिसून येते आहे, असे डॉ. स्नेहल शेकटकर यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com