'विद्यार्थ्यांसाठी कायपण'; राज्य सरकारचा 'हा' आहे नवा फंडा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

- अध्ययनासाठी आकाशवाणी व दूरदर्शनवर अधिक तासाची मागणी
- दरदिवशी दूरदर्शनवर १२ तास, तर आकाशवाणीवर दोन तास मिळावेत यासाठी प्रयत्न.

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवर दरदिवशी बारा तास आणि आकाशवाणीवर दरदिवशी दोन तास याप्रमाणे अध्यापनाची सुविधा द्यावी. तसेच व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे थेट प्रक्षेपण करणेही शक्य आहे.

- विद्यार्थी म्हणताहेत, 'आता चर्चा बास झाली, परीक्षेचे काय ते ठरवा!'

त्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने त्यासंदर्भात आवश्यक ती परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिले आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) दूरदर्शन आणि आकाशवाणीवर अभ्यासक्रमाच्या प्रक्षेपणाला परवानगी द्यावी, यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा केंद्र सरकारसमवेत पत्र व्यवहार सूरू आहे. याबाबतची माहिती गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

- बारावीच्या विद्यार्थ्यांनो, हिंदी विषयाचा अभ्यास असणार 'बहोत हार्ड'!

"गेल्या दहा आठवड्यांपासून देशभरातील शाळा बंद आहेत.  लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया गेला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विविध पर्याय शोधत आहेत.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी देशातील विविध राज्यांना दूरदर्शनच्या माध्यमातून शैक्षणिक आशय देण्यासाठी परवानगी दिली आहे, ही केंद्र सरकारची भूमिका स्वागतार्ह आहे. राज्य सरकार देखील ही सुविधा घेण्यास इच्छुक आहे," असे गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे.

- Big Breaking : यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द

हजारो तासांचा आशय तयार
"तासानुसार शैक्षणिक आशय बनविण्याची तयारी यापूर्वीच सुरू झाली आहे. आतापर्यंत जवळपास एक हजाराहुन अधिक तासांचा आशय तयार आहे. डिजीटल आणि अन्य माध्यमातून मुलांना शिकविण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद 'नोडल अॅकॅडमिक संस्था' म्हणून कार्यरत आहे. परिषदेद्वारे समन्वयकाची भूमिका पार पाडली जात आहे," असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State govt requested to central govt to give 12 hr air on national tv and 2 hr radio slot