esakal | बारावीच्या विद्यार्थ्यांनो, हिंदी विषयाचा अभ्यास असणार 'बहोत हार्ड'!
sakal

बोलून बातमी शोधा

HSC-Hindi

बदलत्या काळानुसार पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे. परंतु ते बदल करत असताना विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तराचा विचार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, हिंदी विषयाचा अभ्यास असणार 'बहोत हार्ड'!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या हिंदी युवकभारती विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी अवघड असणार आहे. या पुस्तकाची रचना विद्यार्थ्यांसाठी कठीण करण्यात आल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

पुस्तकातील काही पाठ कविता आणि इतर काही घटक हे वरिष्ठ महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तरानुसार आहेत. तसेच जे शिक्षक उच्च माध्यमिक विभागांमध्ये कार्यरत नाहीत, अशा शिक्षकांचा समावेश अकरावी भाषा समिती हिंदी यामध्ये समावेश करण्यात आलेला आल्याची टीका विषय शिक्षकांनी केली आहे.

- जिल्हाधिकारी ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री; जाणून घ्या अजित जोगी यांचा रंजक प्रवास!

सध्या भाषा विषयाच्या पुस्तकांमध्ये साहित्यामधील सर्व प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसे कठीण जाण्याची शक्यता आहे. भाषा विषयाची पुस्तके तयार करत असताना त्यामधील घटक निवडताना बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भौतिक स्तर लक्षात न घेता तयार केली गेली आहेत.
सर्वच विषयांसाठी बालभारतीने या वर्षी तरी किमान दीक्षा ॲपवर बारावीचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच ऑनलाइन पाठ्यपुस्तकाचे प्रशिक्षण घेता आले, तर त्याचेही नियोजन करावे, अशी शिक्षकांची मागणी आहे.

- पुणे : बदलीची चर्चा आणि रूबल अग्रवाल भल्या पहाटेच उतरल्या रस्त्यावर

गेल्या वर्षी बालभारतीने फक्त पाठ्यपुस्तक उपलब्ध करून दिले होते. परंतु त्यावर कोणतेही शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले नाही, तसेच कोणतेही प्रशिक्षणही घेतले नाही. त्यामुळे  शिक्षकांनी त्यामधील संकल्पना आपल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगाव्या लागल्या परंतु त्यामध्ये एक वाक्यता ही दिसून आली नाही. सर्वच विषयाच्या भाषा समितीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमधील कार्यरत शिक्षकांचे प्रमाण अत्यल्प आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

- Big Breaking : यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द

बदलत्या काळानुसार पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे. परंतु ते बदल करत असताना विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तराचा विचार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. पाठ्यपुस्तक तयार करत असताना सर्व मूल्यांचा विचार करून तसेच विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल अशा पद्धतीचा पाठ्यक्रम तयार करणे महत्त्वाचे व गरजेचे आहे, असे मत शिक्षक व्यक्त करीत आहे.

- Big breaking : पुणे विद्यापीठाच्या निकालाची प्रतिक्षा संपली?

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न करता हिंदीची काठिण्य पातळी वाढविली आहे. हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. या शिवाय अभ्यास मंडळचा सदस्य निवडीतही पारदर्शकता नाही. यापुढील काळात पारदर्शकता आल्यास विद्यार्थिभिमुख अभ्यासक्रम तयार होईल.
- डॉ. मिलिंद कांबळे, हिंदी विषय शिक्षक, बारामती

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा