कर्मचारी हजर अन् एसटी गैरहजर!

एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार पुणे विभागातही कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.
ST
STESAKAL
Summary

एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार पुणे विभागातही कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.

पुणे - राज्य परिवहन महामंडळाचे (State Transport Corporation) सर्व कर्मचारी (Employee) कामावर परतले तरी पुण्यात एसटी सेवा (Pune ST Service) पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचे चिन्हे नाहीत, कारण गेल्या ५ महिन्यांपासून बंद असलेल्या जवळपास १०० बसची दुरुस्ती (Bus Repairing) व ५० बसचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) (RTO) वार्षिक नूतनीकरण (पासिंग) अद्याप बाकी आहे. त्यासाठी आणखी किमान १५ दिवस लागतील. परिणामी, पुणे विभागाची एसटी वाहतूक ५ मे नंतरच पूर्ववत होईल.

एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार पुणे विभागातही कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून अनेक बस जागेवरच आहेत. त्यामुळे अनेक बसचे इंजिन देखभाल दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. सुटे भागही खराब झाले आहेत. सुमारे १०० बसवर काम करावे लागणार आहे. या प्रक्रियेत १५ दिवसांचा वेळ जाणार आहे. या सर्वांचा विचार करता प्रवासी वाहतूक पूर्ववत होण्यास ५ मे उजाडणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पन्नास बसचे पासिंग रखडले

मोटार वाहन कायद्यानुसार ज्या वाहनांचे आयुर्मान ८ वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांचे दरवर्षी पासिंग करावे लागते. तर ८ वर्षांखालील वाहनांचे दर दोन वर्षांनी पासिंग करावे लागते. पुणे विभागात ८ वर्षांवरील वाहनांचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये सुमारे ४० बसचे २८ एप्रिलनंतर पासिंग होणार आहे. त्यामुळे या बसची ५ मे दरम्यान वाहतूक सुरू होईल.

काही गाड्यांचे देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते काम एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याच दरम्यान आम्ही पासिंगचे काम करू. लवकरात लवकर प्रवासी सेवेत गाड्या धावतील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- अशोक सोंड, प्रभारी विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग

पुणे विभागातील बसची सद्यःस्थिती

  • प्रवासी वाहतूक करणाऱ्या : ८३०

  • मालवाहतूक करणाऱ्या : ७३

  • देखभाल व दुरुस्तीसाठी गेलेल्या : १००

  • पासिंग रखडलेल्या : ५०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com