esakal | धनगर समाजाकडून या मागण्यांसाठी रक्ताने लिहिलेले निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन धनगर ऐक्य अभियानाच्या वतीने इंदापूर व पुरंदर येथील तहसील कार्यालयास देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हे निवेदन देण्यात आले. 

धनगर समाजाकडून या मागण्यांसाठी रक्ताने लिहिलेले निवेदन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे तातडीने आरक्षण द्यावे, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित 22 योजनांची त्वरित अंमलबजावणी करावी, त्यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, मेंढपाळावरील हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन धनगर ऐक्य अभियानाच्या वतीने इंदापूर व पुरंदर येथील तहसील कार्यालयास देण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हे निवेदन देण्यात आले. 

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 

इंदापूर : महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य अभियान इंदापूर शाखेच्या वतीने अभियानाचे राज्यप्रमुख डॉ. शशिकांत तरंगे, समन्वयक पोपट पवार, शहा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धनाजी देवकाते यांच्या हस्ते तहसीलदार सोनाली मेटकरी यांना धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

हनुमान बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी स्वतःचे रक्त देऊन हे निवेदन तयार केले. या वेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, इंदापूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव डोंबाळे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, रासपचे तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे, विशाल मारकड, नानासाहेब खरात, आबासाहेब थोरात, तेजस देवकाते, प्रविण हरणावळ, दत्तात्रेय पांढरे उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, दौंडमध्ये मुगाचे दिवसाआड लिलाव

गराडे : सासवड (ता. पुरंदर) येथे धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य व पुरंदर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य धनगर अभियानाचे प्रमुख डॉ. शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली तालुका समन्वयक माणिकराव चोरमले पाटील यांनी रक्तलिखित निवेदन नायब तहसीलदार पठारे यांना देण्यात आले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
या वेळी पुरंदर तालुका धनगर ऐक्य अभियानाचे तालुका समन्वयक माणिकराव चोरमले पाटील, पुरंदर तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष व तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष स्वप्नील बरकडे, माजी सरपंच अशोक बरकडे, सविता बरकडे, सागर चोरमले, शितल चोरमले, राजेंद्र बरकडे, गणेश चोरमले, अतुल बरकडे, नवनाथ बरकडे, दादा चोरमले, बापू बरकडे, दिलीप बरकडे आदी उपस्थित होते.

धनगर ऐक्य अभियान समाजास मुख्य विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभर यात्रा काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर ते बारामतीपर्यंत वारी काढली, बारामती येथे प्राणांतिक उपोषण केले. मात्र, तरीही आमचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आम्ही आता निर्णायक लढाई सुरू केली आहे. सरकारने आमच्या मागण्यांची त्वरित अंमल  बजावणी न केल्यास संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.
 - डॉ. शशिकांत तरंगे,
राज्यप्रमुख, महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य अभियान