पुणेकरांनो, कोरोनाबाबत आली गुड न्यूज; गेल्या ६ दिवसांची आकडेवारी काय सांगते पाहा

Pune_Corona
Pune_Corona

पुणे : पुणेकरांसाठी कोरोनाच्या बाबतीत गुड न्यूज आली आहे. कोरोनावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मागील सहा दिवसांपासून सातत्याने कमी होऊ लागले आहे. शिवाय उपचारानंतर पूर्णपणे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. हे दोन्ही मुद्दे म्हणजे पुण्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे संकेत देणारे आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत काळजी नको, पण खबरदारी हवी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

गेल्या सहा दिवसांत रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या तब्बल सात हजार १७ ने कमी झाली आहे. शिवाय याच कालावधीत तब्बल १४ हजार १९० रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. ही आकडेवारी ४ ऑगष्ट अखेरपर्यंतची आहे.

आजघडीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील मिळून केवळ २६ हजार १२२ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल आहेत. सहा दिवसांपूर्वी दाखल रुग्णांचा हाच आकडा ३३ हजार १३९ इतका होता.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण तब्बल ६६ हजार ६४० रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. हाच आकडा सहा दिवसांपूर्वी म्हणजेच ३० जुलैपर्यंत ५२ हजार ४५० होता. म्हणजेच मागील केवळ सहा दिवसांत १४ हजार १९० जण पूर्णपणे बरे झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवार अखेरपर्यंत एकूण ९४ हजार ९७८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन हजार १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी बुधवारची दिवसभरातील रुग्णांची भर पडणार आहे.

असे होत गेले रुग्ण कमी 

- ३० जुलै - ३३ हजार १३९.

- ३१ जुलै - ३० हजार ५२३.

- १ ऑगष्ट - ३० हजार २६६.

- २ ऑगष्ट - २८ हजार २२३.

- ३ ऑगष्ट - २६ हजार ७९१.

- ४ ऑगष्ट - २६ हजार १२२.

बरे होण्याचे वाढत गेलेले प्रमाण 

- ३० जुलैपर्यंत - ५२ हजार ४५०.

- ३१ जुलै - ५३ हजार ९५१.

- १ ऑगष्ट - ५८ हजार ३१८.

- २ ऑगष्ट - ६० हजार २७२.

- ३ ऑगष्ट - ६३ हजार ९३०.

- ४ ऑगष्ट - ६६ हजार ६४०.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com