थांबलेली गुन्हेगारीही पुण्यात ‘अनलॉक’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

गाडी चालविण्याच्या कामासाठी ३ सप्टेंबर रोजी रात्री उस्मानाबादहून पुण्यात आलेला नागेश दगडु गुंड हा प्रवासी त्याच्या मित्राची वाट पाहत स्वारगेट बसस्थानक परिसरात थांबला होता. त्याचवेळी चोरट्यांनी त्यास अडवून त्याच्याकडील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नागेशने त्यांना विरोध केल्यामुळे चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून केला.

पुणे - गाडी चालविण्याच्या कामासाठी ३ सप्टेंबर रोजी रात्री उस्मानाबादहून पुण्यात आलेला नागेश दगडु गुंड हा प्रवासी त्याच्या मित्राची वाट पाहत स्वारगेट बसस्थानक परिसरात थांबला होता. त्याचवेळी चोरट्यांनी त्यास अडवून त्याच्याकडील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नागेशने त्यांना विरोध केल्यामुळे चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून केला. या आणि अशा स्वरुपाच्या रस्त्यांवरील गुन्ह्यांच्या (स्ट्रिट क्राईम) घटना शहरात घडू लागल्या आहेत. लॉकडाउनमधील थांबलेले हे गुन्हे ‘अनलॉक’मध्ये डोके वर काढू लागले असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये पोलिसांचा रस्त्यावर वावर वाढल्याने तसेच बाहेर पडण्यास परवानी नसल्यामुळे गंभीर व किरकोळ स्वरुपाचे गुन्हे थांबले होते. 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

मात्र शहर जसजसे अनलॉकच्या दिशेने जाऊ लागले, तसतसे गुन्हेगार बाहेर पडून छोट्या-मोठ्या कारणांवरुनही गुन्हे करु लागल्याचे दिसू लागले. विशेषतः रात्रीच्यावेळी अडवून पैसे उकळणे, मोबाईल, मंगळसुत्र, पैशांचे पाकीट जबरदस्तीने हिसकावणे व अन्य किंमती वस्तुंच्या जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. घटनांनुसार, जबरी चोरी करतानाच चोरट्यांकडून नागरिकांना बेदम मारहाणीबरोबरच त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करण्याच्या घटना घडल्या आहेत. एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यालाही या घटनेचा सामना करावा लागला आहे. या वाढत्या घटनांमुळे अगोदरच कोरोनाशी दोन हात करण्यात गुंतलेल्या पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे.

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

सराईतांसह नवे गुन्हेगार
दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर राज्यातील व परराज्यातील गुन्हेगार शहरांकडे वळत असल्याचे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी सारख्या सणांच्यावेळीच्या मोबाईल, पाकीट चोरट्यांना पकडल्यानंतर स्पष्ट होते. परंतु सध्या रस्त्यावरील गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने घडत असून त्यामध्ये सराईत गुन्हेगारांसह तरुणांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित चोरटे, गुन्हेगार नेहमीपेक्षा जास्त आक्रमक झाल्याचे एक निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.

पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 24) 3521 नवे कोरोना रुग्ण: मृत्यूचा आकडा ६००० पार

जबरी चोरीच्या गुन्हेगारांची तपासणी करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. तसेच कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारांवरही बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जबरी चोरी घडणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे, पोलिसांची गस्त व नाकाबंदी वाढविणे, कोम्बिंग ऑपरेशन राबवून या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले जात आहे. 
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stopped crime also unlocked in Pune