Pune Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ विचित्र अपघात; आठ ते नऊ वाहनांची धडक, नेमकं काय घडलं?

Navale bridge accident: पुण्यातील नवले पुलाजवळ एक विचित्र अपघात झाला आहे. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे.
Pune Navale Bridge Accident
Pune Navale Bridge Accidentesakal

Pune Navale Bridge Accident:

धायरी : नवले पुलाजवळ ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात झाला. अपघातात ७ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रकचालक गाडी सोडून पळून गेला.

कात्रजकडून (कात्रज देहू बाह्य वळण रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या जवळ हा विचित्र अपघात घडला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर थांबलेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे  विचित्र अपघात घडत लहानमोठी ७ वाहने एकमेकांना धडकली.

Pune Navale Bridge Accident
Defense Expo : मोशीत आजपासून ‘डिफेन्स एक्स्पो’ ; उद्योगमंत्री सामंत यांच्याकडून पूर्वतयारीची पाहणी

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. तसेच जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Pune Accident News)

Pune Navale Bridge Accident
Dr. Mohan Bhagwat : श्रीक्षेत्र भगवानगडाच्या महंतांनी घेतली सरसंघचालकांची भेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com