Pune News : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ तीन महिन्यांपासून पथदिवे बंद; पालिकेचे कामाकडे दुर्लक्ष

दहा सोसायट्यांचे पालिकेला निवेदन; पालिकेचे कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा रहिवाशांचा आरोप
Pune News : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ तीन महिन्यांपासून पथदिवे बंद; पालिकेचे कामाकडे दुर्लक्ष

किरकटवाडी: सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड फाटा परिसरातील लगड कॉलनी येथील पथदिवे मागील तब्बल तीन महिन्यांपासून बंद असल्याने रहिवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

परिसरातील दहा गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी एकत्रित येऊन पथदिवे दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे निवेदन दिलेले असून संबंधित विभागाकडून कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत.

नांदेड फाट्याजवळील सर्व्हे नंबर 12, लगड कॉलनी येथे मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारती व औद्योगिक वसाहत आहे. या भागातील रस्त्यांवरील पथदिवे मागील तब्बल तीन महिन्यांपासून बंद असल्याने महिला,मुली, ज्येष्ठ नागरिक यांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. पथदिवे दुरुस्त करण्यासाठी जाधव-लगड कॉम्प्लेक्स,

चंद्रभागा रेसिडेन्सी, समर्थ रेसिडेन्सी, रोकडे कॉम्प्लेक्स, ओम क्लासिक, साई अंगण, ओम पॅराडाईज, सहयोग सोसायटी व इतर सोसायटीच्या रहिवाशांनी एकत्रित येऊन पालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात निवेदन दिलेले आहे. तसेच नागरिक सातत्याने काम करुन घेण्यासाठी पाठपुरावा करत आहेत मात्र पालिकेकडून विलंब होत असल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Pune News : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ तीन महिन्यांपासून पथदिवे बंद; पालिकेचे कामाकडे दुर्लक्ष
Pune News : गृहनिर्माण सोसायटीमध्येही स्थापन होणार तंटामुक्ती समिती : उपनिबंधक संजय राऊत

"सुमारे तीन महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने सर्वांची गैरसोय होत आहे. अंधार झाल्यानंतर महिलांना घराबाहेर निघणे अवघड झाले आहे. पालिककडे निवेदन दिले, परंतु अद्यापही काम झालेले नाही."

- ॲड. लाला आटोळे, रहिवासी.

"मुख्य केबल नादुरुस्त झाल्याने पथदिवे सुरू करण्यास विलंब झाला आहे. खोदकाम करुन केबल टाकण्याचे काम सुरू असून एक ते दोन दिवसांत सर्व पथदिवे पूर्ववत सुरू होतील." - मोनाली मोरे, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com