Indian Army
Indian ArmySakal

कोणत्याही देशाची ताकद ही त्याच्या लष्करी सामर्थ्यातून सिद्ध होते

भारतीय उपखंडातील बदलत्या भू-राजकारणामुळे गेल्या दशकापासून मित्र देशांबरोबर संयुक्त युद्ध सरावांमध्ये वाढ झाली आहे.

पुणे - कोणत्याही देशाची (Country) ताकद (Power) ही त्याच्या लष्करी (Army) सामर्थ्यातून सिद्ध होत असते. अलीकडे अनेक देशांचे लष्कर एकमेकांसमोर उभे राहते मात्र ते लढण्यासाठी नव्हे, तर युद्ध अभ्यासाद्वारे एकमेकाची रणनीती, तंत्रज्ञानाची देवान घेवाण अन् मैत्रिपूर्ण संबंधासाठी ! यातून युद्ध प्रशिक्षण तर होतेच, त्याशिवाय शत्रू राष्ट्राला योग्य ‘तो’ संदेशही अप्रत्यक्षरीत्या पोहचत असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

भारतीय उपखंडातील बदलत्या भू-राजकारणामुळे गेल्या दशकापासून मित्र देशांबरोबर संयुक्त युद्ध सरावांमध्ये वाढ झाली आहे. हे नियमितपणे दरवर्षी आयोजित केले जातात. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या राष्ट्रसमूहांची आघाडी (क्वाड) व इतर अशा आघाड्यांची येत्या काळात स्थापना झाल्यावर युद्ध सराव आणखीन वाढतील. असे संरक्षण विश्र्लेषक मेजर जनरल (निवृत्त) राजन कोचर यांनी सांगितले.

Indian Army
Pune Unlock: पुण्यात मॉल सुरु, पण प्रशासनाची एक अट

युद्धाभ्यासाचे फायदे

- प्रगत तंत्रज्ञानाची ओळख होते व त्यास कसे वापरावे याची माहिती मिळते

- युध्दाभ्यासमुळेबसामरिक सज्जता

- मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करण्यासाठी

- समुद्री भागात व्यापारी जहाजांचे संरक्षण

- आपत्तीच्या वेळी मदत

‘दोन देशातील युद्धाभ्यासामुळे केवळ युद्धकाळातच नाही तर शांततेच्या काळात मदतकार्यांपासून मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. यात आपला पैसा नक्की खर्च होतो. पण त्याचा फायदा पैशांत मोजता येणार नाही. सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले युद्धाभ्यसांची जागतिक राजकारणानूसार महत्त्व आणि वारंवारिता निश्चित होते.’

- कमोडोर (निवृत्त) एस.एल. देशमुख

Indian Army
पुणे : न्यू कोपरे येथील आगीत एकाचा जळून मृत्यू

‘अमेरिका, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मंगोलिया, फ्रांस, सिंगापूर, इंडोनेशिया, जपान आदी विविध देशांसोबत भारताच्या तिन्ही दलांचे युद्ध सराव होत आहेत. केवळ इतकंच नाही तर दोन देशांमधील संस्कृतीची घेवाण देवाण सुद्धा या माध्यमातून साध्य होते.’

- विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक

मित्रदेशांबरोबरचे काही युद्ध सराव

युद्ध सराव - भारताबरोबर सहभाग घेणारे मित्र देश

सिंबेक्स - सिंगापूर

मित्र शक्ती - श्रीलंका

वज्र प्रहार - अमेरिका

संप्रिती - बांगलादेश

मलबार - जपान व अमेरिका

शक्ती अभ्यास - फ्रांस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com