esakal | सागरी मोहिमांना मिळणार बळ; सयंत्र तरंगण्याची शक्ती नियंत्रित ठेवणे ‘व्हीबीएस’द्वारे सोपे

बोलून बातमी शोधा

सागरी मोहिमांना मिळणार बळ; सयंत्र तरंगण्याची शक्ती नियंत्रित ठेवणे ‘व्हीबीएस’द्वारे सोपे}

पाण्यातील मोहिमा व सर्वेक्षणादरम्यान मानवी जीवनाची जोखीम टाळण्यासाठी सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करत पाण्याखाली चालणाऱ्या स्वयंचलित वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे.

सागरी मोहिमांना मिळणार बळ; सयंत्र तरंगण्याची शक्ती नियंत्रित ठेवणे ‘व्हीबीएस’द्वारे सोपे
sakal_logo
By
अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे - खनिज तेल, जलचर, मीठ, औषधी वनस्पती आदी समृद्ध नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण असलेल्या महासागरात वेळोवेळी सर्वेक्षणे, लष्करी मोहिमा आखण्यात येतात. खोल पाण्यातील मोहिमा व सर्वेक्षण करणाऱ्या संयंत्रांसाठी (पाणबुड्या किंवा स्वयंचलित वाहने) ‘व्हेरिएबल बॉयन्सी सिस्टम’ची (व्हीबीएस) रचना करण्यात आली आहे. यामुळे खोल पाण्यातही सहजतेने संयंत्रांची तरंगण्याची शक्ती नियंत्रित ठेवणे सोपे झाले आहे.  

पाण्यातील मोहिमा व सर्वेक्षणादरम्यान मानवी जीवनाची जोखीम टाळण्यासाठी सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करत पाण्याखाली चालणाऱ्या स्वयंचलित वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या वाहनांवरील विविध प्रकारच्या उपकरणांमुळे वाहनांच्या वजनात दहा ते तीस टक्के वाढ होते. त्यामुळे पाण्यातील खोलवरच्या मोहिमा आणि सर्वेक्षणादरम्यान वाहनांना नियंत्रित ठेवणे आव्हानात्मक ठरते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, मद्रास’च्या (आयआयटीएम) डॉ. बी. के. तिवारी आणि डॉ. आर. शर्मा यांचे हे संशोधन ‘डिफेन्स सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहे. त्यामुळे समुद्रतळातील सागरी मोहीमांना ‘व्हीबीएस’च्या  सहाय्याने वाहनांच्या तरंगण्याची शक्ती नियंत्रित ठेवण्यास मदत होणार आहे. 

पुणेकरांनो पालिकेच्या एक दिवसाच्या ऑनलाइन सभेचा खर्च बघा

ठळक वैशिष्ट्ये 
वजनाने हलके आणि स्वायत्त वाहनांच्या तरंगण्याची शक्ती नियंत्रित करते 
सुमारे २० टक्के ऊर्जेचा वापर कमी 
सध्या १०० मीटर खोलवर चाचणी 
स्वयंचलित वाहनांच्या बचाव मोहिमांमध्ये कार्यक्षम 
नागरी किंवा लष्करी 
क्षेत्रासाठी उपयुक्त 

हे वाचा - मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार; स्मशानभूमीतील बेड चोरट्यांनी पळवला!

अशी आहे यंत्रणा... 
खोल समुद्रात वाहनांची तरंगण्याची शक्ती अनियंत्रित झाल्यावर ते वाहन समुद्रतळात कोसळण्याची शक्यता असते. त्यावर बसविण्यात येणाऱ्या सेन्सर आणि उपकरणांच्या वजनामुळे नियंत्रण बिघडते. त्याचबरोबर वाहनाला योग्य दिशेने व गतीने चालना मिळावी, यासाठी इंधनाचा (प्रोपेलंट) वापर केला जातो. परिणामी मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर होतो. या पार्श्‍वभूमीवर अशा वाहनांच्या तरंगण्याची शक्ती नियंत्रित ठेवण्यासाठी ‘व्हीबीएस’चा वापर केला जातो. त्यामुळे पाण्याखाली विशिष्ट स्तरावर (डेप्थ) असलेले नमुने किंवा पाहणी करणे सुलभ होते. तसेच इंधनाचा आणि ऊर्जेचा वापर कमी केला जाऊ शकतो.