PMC Bharari Pathak : नागरिकांमध्ये भरारी पथकाची धास्ती ; सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई तीव्र

‘‘हॉटेल चालक, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल दंड भरलेला नाही, दंड त्वरित भरा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल’’, असा इशारा महापालिकेच्या भरारी पथकाच्या पिवळ्या-पांढऱ्या गाडीत बसलेल्या कर्मचाऱ्याने स्पीकरद्वारे दिला अन्‌ पुढच्या काही मिनिटांतच हॉटेलचालकाने दंडाची रक्कम त्वरित भरली.
PMC Bharari Pathak
PMC Bharari Pathak sakal

पुणे : ‘‘हॉटेल चालक, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल दंड भरलेला नाही, दंड त्वरित भरा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल’’, असा इशारा महापालिकेच्या भरारी पथकाच्या पिवळ्या-पांढऱ्या गाडीत बसलेल्या कर्मचाऱ्याने स्पीकरद्वारे दिला अन्‌ पुढच्या काही मिनिटांतच हॉटेलचालकाने दंडाची रक्कम त्वरित भरली. याच पद्धतीने सध्या शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासह स्वच्छतेबाबत जागृती करण्यावर महापालिकेच्या भरारी पथकाद्वारे भर दिला जात आहे. यातून नागरिकांना स्वच्छतेची शिस्त लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या, अस्वच्छता निर्माण करणाऱ्या नागरिक, व्यावसायिक, आस्थापनांवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी भरारी पथके तयार केली आहेत. भरारी पथकाच्या कामाला गती द्यावी, यासाठी चार नवीन वाहने घेण्यात आली. विशेषतः संबंधित वाहनांवर स्पीकरची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाची भरारी पथके कोथरूड, बावधन, हडपसर, नगर रस्ता या परिसरासह शहराच्या वेगवेगळ्या भागांत स्वच्छतेबाबत जागृती करण्यावर भर देत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्‌स यांसह विविध प्रकारच्या आस्थापनांकडून स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे. याबरोबरच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्या, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरही भरारी पथक कारवाई करत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांमध्ये जागृती करण्यावर भर दिला जात आहे.

PMC Bharari Pathak
Pune Airport : विमानापर्यंतचा प्रवास कासवगतीने! सुविधा कोलमडल्या; विमानतळावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

भरारी पथकांद्वारे शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे हा उद्देश आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पथकांमुळे नागरिकांमध्ये जागृती होत आहे, त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत.

- राम सोनवणे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात. त्यांच्यावर भरारी पथकांद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. आपले शहर स्वच्छ ठेवण्याची शिस्त प्रत्येक नागरिकाला लागली पाहिजे.

- विजय धनावडे, नोकरदार, कोथरूड.

भरारी पथकाच्या कामाचे स्वरूप

भरारी पथकाच्या वाहनामध्ये एक वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, प्रत्येकी दोन आरोग्य निरीक्षक, मुकादम व बिगारी असे एकूण सात अधिकारी, कर्मचारी असतात. सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत संबंधित भरारी पथक त्यांच्या हद्दीमध्ये फिरते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या, अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाते. तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाते.

होणारे सकारात्मक परिणाम

  • सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होऊ लागले.

  • श्‍वानांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता होऊ नये, यासाठी श्‍वानप्रेमी घेऊ लागले काळजी.

  • हॉटेल, रेस्टॉरंटमधील कचरा महापालिकेच्या कचरा गाड्यांकडे देण्यास प्राधान्य.

  • नदीपात्र, मोकळ्या जागांवर राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई वाढली

  • विक्रेत्यांकडून प्लॅस्टिकचा वापर टाळण्यास प्राधान्य.

  • बेशिस्त पार्किंग, चौकांमध्ये नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकारांवर आले नियंत्रण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com