पुणे पोलिसांकडून पासही रद्द : घराबाहेर पडणाऱयांवर कडक कारवाई; 'हे' आहेत नवीन नियम

Strict implementation of curfew in Pune by Cancellation of pass except for urgent service.jpg
Strict implementation of curfew in Pune by Cancellation of pass except for urgent service.jpg
Updated on

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण पुणे शहर २७ एप्रिलपर्यंत 'सील' करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून सोमवारपासून नागरिकांना शहरात संचार करण्यास सक्त मनाई (कर्फ्यु) आदेश लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांची दुकाने काही तास सुरू राहणार आहेत, तर ऑनलाइन व घरपोच सेवांच्या वेळाही बदलल्या आहेत. वाहतूकबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीच शहरात संचारबंदी केली होती. तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत असतानाही  रुग्ण संख्या वाढीचा वेग थांबविण्यात यश येत नसल्याची सद्यस्थिती आहे. या सगळ्या कारणांचा विचार करून संपूर्ण शहर २७ एप्रिलपर्यंत 'सील' करण्यात आले आहे.

Coronavirus : आईला कोरोना; पण नवजात अर्भक ठणठणीत
शहरात सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून पुढील सात दिवस म्हणजेच २७ एप्रिल मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वीच्या काही नियमांमध्ये काही प्रमाणात बदल केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा विषयी काही नियमात  बदल केले आहेत. महापालिकेच्या प्रस्तावानुसार पोलिसांनी रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून शहर 'सील' केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही. शिवाय विना मास्क आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे..

Video : आयटीयन्स'ला सोशल डिस्टन्सिंगची धाकधूक; पालकमंत्र्याकडे मांडली कैफियत

- अत्यावश्यक सेवा (दूध, दुग्धोत्पादन, किराणा, फळे, भाजीपाला इत्यादी) यांच्या वाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी डिजीटल पासची गरज नाही.

- जीवनावश्यक वस्तू विक्रेते ( दूध, दुग्धोत्पादन, किराणा, फळे, भाजीपाला, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल पंप, रेशन दुकान) तसेच इतर अत्यावश्यक सेवेशी संबंधित व्यक्ती बाबत पोलिस, शासनाचे इतर विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पास व परस्पर पूरक यंत्रणा निर्माण केली आहे.ती यापुढील मनाई कालावधीत सुरू राहील.

- मनाई आदेश यांना लागू नसतील : संरक्षण दल, आरोग्य विभाग, दवाखाना, औषधालय,अत्यवस्थ रुग्णाची वाहतूक, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधीत महापालिका व इतर शासकीय विभागांच्या सेवा, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी (कर्फ्यु पास सह) पोलिस सहआयुक्त यांच्याकडून परवानगी दिलेल्या व्यक्ती (पोलिसांकडून दिलेले डिजीटल पासधारक).

Corona Virus : पुण्यात 4 तास बेवारस मृतदेह रस्त्यावर, कोरोनाची भीती? मागत होता 'ही' औषधे

पोलिसांनी मार्गदर्शक सूचनांची जाहीर  केलेले नवीन नियम

- जीवनावश्यक वस्तू व सेवा (दूध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला) पुरविणारे केंद्रे दिवसभरात केवळ चार तास म्हणजेच सकाळी १०  ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी.

- जीवनावश्यक वस्तू विक्रेते : ई- कॉमर्स, घरपोच किराणा माल, फळे व भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यासाठी फिल्पकार्ड, अमेझॉन तसेच इतर ऑनलाईन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामे करता येणार आहेत. त्याच वेळेत त्यांनी सेवा द्यायची आहे.

- खाद्यपदार्थ वितरनासाठी बिग बास्केट, स्वीगी झोमॅटो तसेच इतर ऑनलाइन सेवा देणाऱ्या उद्योगांना सकाळी १० ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सेवा देता येणार आहे. 

- अत्यावश्यक व तातडीची औषधे ग्राहकांना घरपोच देण्यासाठी २४ तास सूट असणार आहे.
 

फेसबुकवर जुन्या फोटोंना उजळा;  20 वर्षांपूर्वीचे फोटो अपलोड करण्याचा ट्रेंड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com