Irshalwadi Rehabilitation : इर्शाळवाडीसाठी विद्यार्थ्यांनी जमविले एक लाख रुपये

पिंपरी-चिंचवड महापालिकेंतर्गत असलेल्या मोशी येथील कन्या विद्यालय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी एक लाख रुपयांची रोख मदत संकलित केली.
Teachers
TeachersSakal

पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेंतर्गत असलेल्या मोशी येथील कन्या विद्यालय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी एक लाख रुपयांची रोख मदत संकलित केली. शिक्षक दिनानिमित्त विद्यालयाच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमात ही मदत ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सुपूर्त करण्यात आली.

याप्रसंगी पिंपरीचे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उपायुक्त (शिक्षण विभाग) विजय थोरात, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप व पालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी ‘माझा देश व सामाजिक बांधिलकी’ ही संकल्पना समोर ठेवून विद्यालयात ‘एक हात मदतीचा’ उपक्रम राबविला होता. यासाठी संगीता सस्ते, मुख्याध्यापिका छाया शिंदे, संतोष उपाध्ये, उषा हिले, चंदा शेरे, संतोष शितोळे, माधुरी पवार, श्वेता कुलथे, राजेंद्र पानसरे, उमेश सूर्यवंशी, शांता वायाळ, अरुण दंडवते, सारिका राऊत, पौर्णिमा देवरे, संदीप आबवणे, सोमनाथ शिंदे, प्रणिता इंगळे, माया लोखंडे, पुष्पा कुचेकर, कांचन गोंडे, सरला मोरे, महेश बळी व राजा करवर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तेथील पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ने केलेल्या मदतीच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Bhargavi Chate and ruvira aahire
Bhargavi Chate and ruvira aahiresakal

पहिलीतील मुलीकडून मदत

लहान वयातच सामाजिक बांधिलकी जपत इयत्ता पहिलीमध्ये शिकत असलेल्या पिंपरी-चिंचवड येथील भार्गवी चाटे या मुलीने ११ हजार १११ रुपयांची मदत इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सुपूर्त केली. याप्रसंगी भार्गवीचे आजोबा बबनराव चाटे, आजी मंदाकिनी, वडील सचिन, आई प्रियांका आणि प्रसाद कोलते उपस्थित होते.

लहान वयातच मुलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी आणि इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही आपली जबाबदारी आहे, अशी जाणीव होणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्तीत सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी भावना चाटे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

आजोबांनी केली २५ हजारांची मदत

येरवडा येथे वास्तव्यास असलेले रमेश वाघ यांनी पनवेल येथील नातीच्या आग्रहाखातर इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी २५ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सुपूर्त केला. या वेळी मुलीचे वडील राजेश व आई रश्मी आहिरे उपस्थित होते. अडीच वर्ष वय असलेली आणि भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारी रुविरा आहिरे आजोबांकडे सुटीसाठी आली होती.

त्यावेळी टीव्हीवर इर्शाळवाडी घटनेच्या बातम्या पाहून तेथील लोकांसाठी आपण मदत करू, असा आग्रह आजोबांजवळ धरला. त्यामुळे वाघ यांनी नातीसमोर एकपासून आकडे म्हणण्यास सुरूवात केली. रुविराने त्यांना २५ व्या आकड्याला थांबण्यास सांगितले. वाघ यांनी नातीच्या भविष्यासाठी एक लाख रुपये गुंतविले होते, त्यातील २५ हजार रुपयांची मदत नातीच्या नावे त्यांनी दिली.

मदतीचे आवाहन...

इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी समाजाला ''सकाळ रिलीफ फंड'' कडून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

अशी करा मदत....

HDFC Bank

Name : Sakal Relief Fund

A/C No : ५७५०००००४२७८२२

IFSC : HDFC००००१०३

Branch - FC Road , Pune

या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करू शकता.

https://sakalrelieffund.com/ या संकेतस्थळावर जाऊन डोनेट नाऊ या बटणावर क्लिक करून देणगीची रक्कम डेबिट वा क्रेडिट कार्ड आणि बँक ट्रान्सफरमार्फत पाठवू शकता. किंवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून देणगी देऊ शकता.

मदतीचा धनादेश दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात सकाळी ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.

‘सकाळ रिलीफ फंडा’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमांतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com