esakal | 'सारथी'च्या निर्णयाविरोधात जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

Students agitation at Jantar Mantar against decision for Sarathi

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने यूपीएसी स्पर्धा परिक्षेसाठी दिल्ली आणि पुणे तर, एमपीएसीच्या स्पर्धा परिक्षेसाठी पुण्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता दिला जातो. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी दैनंदिन हजर राहत असल्याबाबत तसेच तेथील पत्ता आणि घरमालक किंवा वसतिगृहाशी केलेल्या भाडेकराराची माहिती 15 फेब्रुवारीपर्यंत द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबतचे पत्र 14 फेब्रुवारीला काढले. या निर्णयाविरोधात दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले. 

'सारथी'च्या निर्णयाविरोधात जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे: 'सारथी'च्या वतीने दिल्ली आणि पुण्यात कोचिंग क्‍लासेसमध्ये यूपीएसीच्या स्पर्धा परिक्षेसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरमालकाशी किंवा वसतिगृहाशी केलेला भाडेकरार द्यावा, असा आदेश 'सारथी'च्या सहायक प्रकल्प संचालकांनी काढला आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील जंतर मंतरवर सोमवारी शांततेच्या मार्गाने प्रतिकात्मक आंदोलन केले. 

स्थायी समितीत आता महिलाराज; 'यांना' मिळाली संधी

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने यूपीएसी स्पर्धा परिक्षेसाठी दिल्ली आणि पुणे तर, एमपीएसीच्या स्पर्धा परिक्षेसाठी पुण्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता दिला जातो. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी दैनंदिन हजर राहत असल्याबाबत तसेच तेथील पत्ता आणि घरमालक किंवा वसतिगृहाशी केलेल्या भाडेकराराची माहिती 15 फेब्रुवारीपर्यंत द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबतचे पत्र 14 फेब्रुवारीला काढले. या निर्णयाविरोधात दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले. 

अन् पीएमपीएल बसमध्ये चोरी करणाऱ्यास प्रवाशांनीच पकडले

'सारथी'च्या वतीने 225 विद्यार्थ्यांना जुलै 2019 पासून यूपीएससीच्या कोचिंगसाठी दिल्लीला पाठविण्यात आले आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. नोव्हेंबर महिन्यापर्यंत विद्यावेतन वेळेवर दिले जात होते. परंतु डिसेंबरमध्ये चार-पाच दिवस उशीर झाला. जानेवारी महिन्याचे विद्यावेतन 17 फेब्रुवारी उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे रूमचा, मेस आणि अभ्यासिकेचे पैसे थकले आहेत. तेथील विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह राज्यातील मंत्र्यांना पत्र दिले आहे. परंतु या समस्येचे निराकरण झालेले नाही, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. 

मेट्रोच्या ट्रॅफिक वॉर्डनचा ट्रकच्या धडकेने मृत्यू 

'सारथी' प्रशासनाचा कारभार हा लहरी आणि असंवेदनशील आहे. कॉट बेसिसवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे भाडेकराराची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तसेच, विद्यावेतन थकल्यामुळे विद्यार्थ्यांना तेथील खर्च भागवणे शक्‍य होत नाही. 
- राजेंद्र कोंढरे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

loading image