
- क्लासेसला परवानगी मिळाल्याने दिलासा, ऑफलाइनसाठी प्रतीक्षा
- 12वीच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या टप्प्यात होणार लाभ
- स्पर्धा परीक्षांच्या अर्धवट राहिलेल्या बॅच होणार पूर्ण
पुणे : गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्यातील खासगी क्लासेसला टाळे कायम होते. प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या, पण क्लासेस बद्दल काहीच निर्णय होत नव्हता. अखेर पुणे महापालिकेने इयत्ता 9वीपासून पुढे खासगी क्लासेस सुरू करण्याची परवानगी सोमवारी (ता. 11) दिल्याने शहरातील हजारो क्लासचालकांना दिलासा मिळाला आहे.
तर विद्यार्थ्यांची पावले विद्येच्या माहेरघरी वळू लागली आहेत. तथापि परवानगी असली तरी ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही माध्यमातून शिकविले जाणार आहे. पूर्ण क्षमतेने क्लास सुरू होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.
- उर्दू प्रेमींसाठी आनंदाची बातमी; पुणे विद्यापीठानं सुरू केला डिप्लोमा कोर्स!
शाळा सुरू झाल्याने क्लासेसपण सुरू करा अशी मागणी केले काही महिने केली जात होती. क्लासेस बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले आहे. याचा क्लास व पूरक घटकांवर झालेल्या परिणामावर "सकाळ'ने सहा भागात पालिका प्रसिद्ध करून वास्तव समोर आणले होते. दरम्यान, सर्वच व्यवहार अनलॉक होत असल्याने खासगी क्लास सुरू करावेत यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू होत्या. त्यानंतर अखेर मान्यता देण्यात आली. विशेषतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक करणारे विद्यार्थी पुणे सोडून गावाकडे गेले होते, हे विद्यार्थी परत येण्याचे प्रमाण वाढणार आहे.
- Aus vs Ind: टीम इंडियाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त
"येत्या काळात जेईई मेन्स व इतर परीक्षा आहेत, त्यांना अखेरच्या टप्प्यात थेट मार्गदर्शन आवश्यक होते. सध्या कमी क्षमतेने पण ऑफलाइन, ऑनलाइन बॅचेसमधून विद्यार्थ्यांना शिकविले जाईल. अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक स्वरूपात थेट चर्चा केली येईल, त्यामुळे विद्यार्थी, पालकांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे,'' असे एलन करिअर इन्स्टिट्यूटचे पुण्याचे प्रमुख अरुण जैन यांनी सांगितले.
"गेल्या अनेक दिवसांपासून शिकवणी सुरू करावी अशी मागणी होती, ती मान्य करून सकारात्मक पाऊल उचलले आहे. पण महामारीच्या काळात लगेच ऑफलाइन क्लास सुरू न करता काही काळा वाट पहावी लागेल. ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने शिकविले जाईल.''
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्र
- मोठी बातमी : बायडेन यांच्या शपथविधीवेळी दंगलीचा कट; FBI ने दिला अलर्ट
"स्पर्धा परीक्षेच्या तारखा आणि क्लास सुरू होण्याची घोषणा एकाच दिवशी झाल्याने स्पर्धा परीक्षांची दिशा स्पष्ट झाली आहे. त्यामुळे गावाकडील मुले पुण्याकडे येतील. सध्याच्या जून्या बॅच ऑनलाइन सुरू आहेत, त्या ऑफलाइन येत्या आठवड्याभरात सुरू होतील, तर नव्या बॅच जानेवारीच्या शेवटी सुरू होणार आहेत.''
- मनोहर भोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, युनिक ऍकॅडमी
मेस, चहा, पुस्तक विक्रीची उलाढाल वाढली
खासगी क्लासेसला काल परवानगी दिली असली तरी यापूर्वीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी काही प्रमाणात पुण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या सात-आठ महिने आर्थिक विवंचनेत असलेल्या मेसचालक, चहा विक्रेतेंकडे गर्दी वाढली आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून पुस्तकविक्रीमध्येही वाढ झाली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)