विद्यार्थ्यांना मिळेल आवडीचे इंजिनिअरींग काॅलेज

admission
admission

सीईटीचे पर्सेंटाइल घटले तरी रँकमध्ये बदल नाही
पुणे - कोरोना सारख्या महामार्गाच्या काळात विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवून खूप चांगला अभ्यास केला त्याचे प्रत्यंतर त्यांच्या गुणांमध्ये दिसत आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने पर्सेंटाइल अपेक्षेपेक्षा कमी आले आहे, पण त्याचा परिणाम त्यांच्या प्रवेशावर होणार नाही. रँकिंग चांगले असल्याने आवडीच्या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये सहज प्रवेश मिळेल असे तज्ज्ञांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सीईटी सेलने शनिवारी रात्री इंजिनीअरिंग, फार्मसी, ऍग्री पदवीच्या सीईटीचा निकाल जाहीर केला. या सीईटीसाठी राज्यभरातून ५ लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेला २८.७३ टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. लॉकडाऊनमुळे परीक्षा लांबणीवर पडत असल्याने व जेईई मेन्स व जेईई ॲडव्हान्स या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्याने एमएचटी-सीईटी देण्याचे घसरले.

आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, "आमच्या क्लासचा क्षितिज साळुंके याला ९९.९९ पर्सेंटाइल मिळाले आहेत, तर इतर ४१ जणांना ९९ पर्सेंटाइल मिळाले आहेत. या वर्षी सीईटी देणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे पर्सेंटाइल कमी आल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीच्या निकालासोबत तुलना केल्यास त्यांचे पर्सेंटाइल कमी होईन देखील रँकिंगही मागच्या वर्षी प्रमाणे आहे. त्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकेल. 

देवधरस ऍकडमी ऑफ एक्‍सलन्सचे (डीएई) संस्थापक संचालक संदीप देवधर म्हणाले, 'राज्यात पहिली आलेली सानिका गुमास्ते ही आमची विद्यार्थीनी आहे. तर ८ जणांना ९९ पर्सेंटाइल मिळाले आहेत. लाॅकडाऊनच्या काळात संयम ठेवून अभ्यास करणे अवघड होते, अशा काळात विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण कौतुकास्पद आहेत, त्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल. 

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

चुकीच्या प्रश्नांमुळे २३ गुणांची खैरात 
सीईटी सेलने परीक्षा घेताना ७ ते ८ स्लाॅटमध्ये चुकीचे प्रश्न विचारल्याने हजारो विद्यार्थ्यांना २३ गुण द्यावे लागते. अशा पद्धतीने सदोष प्रश्न सीईटी सेलने काढल्यास त्यांच्यावरील विश्वास कमी होईल. यापुढे अशा चुका केल्या जाऊ नयेत. 

डिपरच्या राज्यभरातील किमान ६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले असल्याचे समोर आले आहे. राज्यात दुसरा आलेला सौरभ जोग हा आमचा विद्यार्थी आहे, असे डिपरचे संस्थापक सचिव हरीश बुटले यांनी सांगितले. 

पर्सेंटाइल आणि गुणांची तुलना (सरासरी) 
पर्सेंटाइल-  २०१९ (गुण) - २०२० (गुण) 

९९.९९     - १७५     -  १८५
९९           -१५०    -    १६०
९८          - १४०    -    १५०
९५           - १२५    -   १३५
९२          - १००    -    ११५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com