Hadapsar News : भाडेकरूची माहिती सादर करा अन्यथा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल - रविंद्र शेळके

भाडेकरूबाबतचा कायदा होऊनही अनेक मिळकतदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
Submit tenant details otherwise legal action will taken ravindra shelke pune hadapsar
Submit tenant details otherwise legal action will taken ravindra shelke pune hadapsaresakal

हडपसर : घरमालकाने घर भाड्याने देताना भाडेकरार करून तो पोलीसठाण्यात सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक घरमालकांनी भाडेकरू ठेऊनही त्याची माहिती पोलीसठाण्यात दिलेली नाही. हडपसर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून माहितीपत्रकाद्वारे भाडेकरारासह भाडेकरूची माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे.

त्यामध्ये टाळाटाळ झाल्यास घरमालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिला आहे. नुकतेच कोंढवा येथे दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाडेकरूची माहिती ठेवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Submit tenant details otherwise legal action will taken ravindra shelke pune hadapsar
Pune Market News : लसूण, गवार, टोमॅटोच्या भावांत वीस टक्क्यांनी वाढ

अनेक मिळकतदार बंधनकारक असतानाही भाडेकरार करीत नाहीत. तो केला तर पोलीसठाण्यात जमा करीत नाहीत. त्यामुळे अनेक गुन्हेगार अशा ठिकाणी अश्रय घेत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यातून सामाजिक सुरक्षेसह देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे.

Submit tenant details otherwise legal action will taken ravindra shelke pune hadapsar
Hadapsar News: TDR न दिल्याने जागा मालकाने अडवला रस्ता; प्रवाशांची होतेय गैरसोय

हडपसर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत भाडेकरार व पोलिसांकडे जमा करायच्या माहिती कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी एक पत्रक प्रकाशित करून भाडेकरारासह भाडेकरूची संपूर्ण माहिती पोलीसठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्याबाबत घरमालकाकडून टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. हे पत्रक पोलिसांनी सर्व सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे.

Submit tenant details otherwise legal action will taken ravindra shelke pune hadapsar
Hadapsar Railway Terminal : हडपसर रेल्वे टर्मिनल विकासासाठी १३६ कोटी मंजूर

"भाडेकरूबाबतचा कायदा होऊनही अनेक मिळकतदार त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भाडेकरूची योग्य माहिती न ठेवल्यामुळे समाजकंटकांचे फावले आहे. त्यातून अनेक वाईट घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्येक मिळकतदाराने भाडेकरू ठेवताना संबंधीत भाडेकरूच्या चरित्र प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून घ्यावेत. त्याची जास्तीतजास्त माहिती मिळवून पोलिसांना ती वेळेत सादर करावी. सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे.'

- रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com