
भिगवण : इंदापुर तालुक्यासह जिल्हयामध्ये कोरोनाचा कहर पहावयास मिळत असताना भिगवण पोलिसांनी सतर्कतेमुळे मागील महिन्यामुळे केलेल्या कारवाईमुळे भिगवण व परिसरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. भिगवण पोलिसांच्या माध्यमातून मागील महिन्यामध्ये ३१३२ व्यक्तींवर कारवाई करत ६ लाख २६ हजार चारशे रुपये दंड वसुल केला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मागील महिन्यांमध्ये इंदापुर तालुक्यासह जिल्ह्यांमध्ये विक्रमी कोरोनाचे रुग्न आढळुन आले परंतु, याच कालावधीमध्ये भिगवण शहर व परिसरांमध्ये कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यात पोलिस प्रशासनास यश आल्याचे चित्र येथे पहावयास मिळाले. भिगवण शहरांमध्ये काही अपवाद वगळता कोरोनाचे मोजकेच रुग्न आढळुन आले. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण हे गांव पुणे, सोलापुर, अहमनगर व सोलापुर अशा चार जिल्ह्याच्या सिमारेषांवर आहे. येथे विविध जिल्ह्यातील नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे येथे कोरोनाचा धोका अधिक होता. परंतु भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने भिगवण शहराच्या सर्व प्रवेशद्वाराजवळ चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे शहरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मास्क सक्तीचा करण्यात आला होता तसेच वाहतुक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होते का ? याकडेही कटाक्षाने लक्ष देण्यात आले होते.
महत्त्वाची बातमी : पुणे जिल्ह्यातील `हा` भाग उद्यापासून सात दिवस राहणार बंद
भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने विना मास्क वावरणाऱ्या १७८७ व्यक्तींवर कारवाई करत ३ लाख ५७ हजार चारशे रुपये दंड वसुल केला तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लखंन करणाऱ्या १३४५ व्यक्तींविरुध्द कारवाई करत २ लाख ६९ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. कलम १८८चे उल्लंघन करणाऱ्या ७३ व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात आली. पोलिस प्रशासनाच्या थेट कारवाईची धास्ती घेत नागरिकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात काही प्रमाणात यश आले.
याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे तसेच वाहतुकीचे नियमही काटेकोटरपणे पाळले जातील याबाबींकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. मागील महिन्यांमध्ये सुमारे ३१३२ लोकांवर कारवाई केल्यामुळे लोक सध्या मास्कचा वापर व वाहतुकीचे नियमाबाबत सजग झाले आहेत त्याचा परिणाम कोरोनाचा प्रसार रोखण्यासह मदत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.