Success story of shweta pandit : सफाई कामगाराच्या मुलीचे भारतीय नौदलात घवघवीत यश, आई-वडिलांच्या कष्टाचे केले चीज

सफाई कामगार ज्याेती पंडीत यांच्या २० वर्षीय मुलीने आपल्या प्रतिकुल परिस्थितीला टक्कर देत भारतीय नौदलात स्थान मिळवले आहे. ती सध्या चिल्का, ओडिसा येथे आपले श्वेता पंडित आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहे. अनेक संकटांवर मात करत आणि आपल्या परिस्थीतीची जान ठेवून तिने आपली स्वप्ने पूर्ण केली आहेत.
shweta patil
shweta patilsakal

Success story of shweta pandit : सफाई कामगार ज्याेती पंडीत यांच्या २० वर्षीय मुलीने आपल्या प्रतिकुल परिस्थितीला टक्कर देत भारतीय नौदलात स्थान मिळवले आहे. ती सध्या चिल्का, ओडिसा येथे आपले श्वेता पंडित आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहे. अनेक संकटांवर मात करत आणि आपल्या परिस्थीतीची जान ठेवून तिने आपली स्वप्ने पूर्ण केली आहेत.

श्वेताने आपले प्राशमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत पूर्ण केले, त्यानंतर तिने साधना इंग्लिश मिडीयम विद्यालय हडपसर येथून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तिने काॅलेजला असताना एनसीसी जाॅईन केली आणि १२ वीत ७८ टक्के मार्कस मिळवली.

तिने पुढील पदवीसाठी हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिच्या रोजच्या रुटीनमुळे तिला काॅलेजला वेळ देता येत नव्हता, त्यामुळे तिने काॅलेज बाहेरुन पूर्ण केले.

श्वेताची आई २०१३ पासून सफाई कामगार म्हणून काम करत आहे तर श्वेताचे वडिल मजूरी करतात, त्यामुळे पैशाअभावी ते श्वेताला कोणत्याही मोठ्या कोचिंग क्लासला पाठवू शकले नाहीत. श्वेताने लेखी परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी युट्यूबवर तिला परवडेल असा कोर्स विकत घेतला आणि त्याचे व्हिडीओ ती पाहू लागली आणि तिने शारीरिक प्रशिक्षणासाठी हडपसर मध्येच ऍकेडमी जाॅईन केली, असं श्वेताच्या आईने सांगितले आहे.

मुलीच्या घवघवीत यशानंतर श्वेताची आई म्हणाली की, "मी माझ्या मुलीची आई आहे याचा मला अभिमान वाटतो. श्वेताला देशसेवा करण्याची तीव्र इच्छा होती. तिला जेव्हा तिच्या निवडीची बातमी समजली होती, तेव्हा आमच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. तिच्या ट्रेनिंगवेळी तिला हव्या असलेल्या गोष्टी मी देऊ शकले नाही, याच मला खुप दूख: वाटत. तिच्या गरजा पूर्ण करण्याठी आणि निधी उभा करण्यासाठी आम्ही आमच्या संस्थेची मदत घेतली. श्वेताच्या यशाने माझे हदय अभिमानाने भरुन आले आहे."

shweta patil
Succes Story : अन्न नव्हते, छत नव्हते, पण आत्मविश्वास होता म्हणून झाले पोलिस

श्वेताची दिनचर्या

श्वेता रोज पहाटे ४.३० वाजता उठायची. ५ वाजता घर सोडून बसने मैदानाच्या दिशेने निघायची. तिच्या शारिरिक प्रशिक्षणाचे सत्र उरकून ती ९.४५ ला घरी यायची. तीचा ठरलेला आहार घेवून ती आईला घरकामात मदत करायची. ती घरी जेवण बनवणे, भांडी घासणे ही कामे करायची. कामे आवरून ती तिच्या लेखी परिक्षेचा अभ्यास करायची, तसेच ती तिच्या लहान भावाला परिक्षेच्या दृष्टीने शिकवायची.

संध्याकाळी पून्हा ती बस पकडून शारिरिक प्रशिक्षणाच्या दूसऱ्या सत्राला जायची. ही तिची दिनचर्या तिला फिजिकल, मेडिकल टेस्ट आणि लेखी परिक्षेमध्ये यश मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली. या तिच्या योग्य शेड्यूलमुळे ती भारतीय नौदलात आपले स्थान निश्चित करु शकली.

shweta patil
Succes Story: शाळेत जाण्यासाठी दररोज 30 किमी चालवायचा सायकल, आज आहे 882 कोटींच्या कंपनीचा मालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com