esakal | कर्मयोगी कारखाना सभासदांचे सर्व पैसे देण्यास बांधील - हर्षवर्धन पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

कर्मयोगी कारखाना सभासदांचे सर्व पैसे देण्यास बांधील - हर्षवर्धन पाटील

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : कर्मयोगी कारखान्याने ३२ वर्षात सभासदांचा एक रुपया देखील बुडवला नसून भविष्यात देखील पैसे बुडविणार नाही. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, दिवंगत माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेस साक्षी ठेवून सभासद शेतकऱ्यांचे पैसे देण्यास बांधील असून कारखान्यास राज्यातील पहिल्या दहा कारखान्यात नेल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही माजी सहकार मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

बिजवडी ( ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पाटील यांच्या १५ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमा व पुतळ्याचे पूजन हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेबजगदाळे ,कारखाना उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे जेष्ठ शेअर होल्डर जवाहर कोठारी होते.

हेही वाचा: सोमय्या बिचारे, त्यांना दोष देऊ नका; मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन

यावेळी हर्षवर्धन पाटील तसेच शंकरराव पाटीलपब्लिकचॅरिटेबलट्रस्टच्या अध्यक्षा तथा कारखाना उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या हस्ते ट्रस्टचे वैद्यकीय व शैक्षणिक १२ लाभार्थ्यां पैकी दादा किसवे, रमेश मोटे, हनुमंत राऊत, श्रीहरी आलंदकर यांना धनादेश वाटप करण्यात आले. त्रिपक्ष निर्णय समितीच्या माध्यमातून कामगारांना १२ टक्के पगारवाढ मिळवून देण्यासाठी भरीव योगदान देणारे हर्षवर्धन पाटील यांचाकामगार संघटनेच्या वतीने मोहन काळे व कामगारांनी सत्कार केला.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, साखर उद्योग सध्या अडचणीतून जात असूनसर्वचकारखान्या पुढे अडचणी आहेत. मात्र या अडचणींवर मात करण्यास आपण सर्वोच्च प्राधान्य दिले असून येत्या हंगामात शेतकरी, कामगार, संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने १४ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे. कर्तृत्व, नेतृत्व तसेच नैतिक अधिष्ठान केंद्रबिंदू मानून सहकार चळवळीच्या माध्यमातून देशात लोक शाही मंदिरे उभे करून सत्यासाठी लढणारे शंकरराव पाटील हे एकमेव नेते होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी पेमेंट बाबतचा संभ्रम दुर करावा असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: दक्षिण कोरियात मराठी कुटुंबांचा गणेशोत्सव

यावेळी पद्माताई भोसले म्हणाल्या, साठ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात शंकररावपाटील यांनी कधी बडेजाव केला नाही. साधीराहणी व उच्च विचारसरणीस त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांचे राजकीय वारस हर्षवर्धन पाटील हे देखील सक्षमतेने काम करत आहेत.

कारखान्याचे कायदेशीर सल्लागार ऍड रामदास नरुटे म्हणाले, राजकारण व समाजकारण हे बावड्याच्या पाटील घराण्यास मिळालेले वरदानअसून शंकरराव पाटील यांनी संधीचे सोनं केले तर हर्षवर्धन पाटील हे त्यांचा आदर्श पुढे चालवत आहेत.

कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील पहिला सहकारी साखर कारखाना अकलूज येथेउभा करण्याचे श्रेय शंकरराव पाटील व शंकरराव मोहिते पाटील यांना जाते. उजनीचे पाणी आल्यानंतर शंकरराव पाटील यांनी इंदापूर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना न्याय दिला.

सुत्रसंचलन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे तर आभार प्रदर्शन संचालक राहुल जाधव यांनी मानले. यावेळी विलासवाघमोडे,अशोक इजगुडे,रघुनाथ राऊत ,

संदेश देवकर,विकास मोरे, हनुमंत जाधव, भास्कर गुरगुडे यांच्या सह कारखान्याचे सर्व संचालक, कामगार व शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top