
Post-Diwali sugarcane crushing season brings relief for farmers, cane cutters, and sugar mills in Maharashtra.
Sakal
सोमेश्वरनगर/पुणे: राज्य सरकारच्या मंत्री समितीने नवा साखर हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, ऊसतोड मजूर व कारखाने या सर्वांच्यादृष्टीने हा निर्णय समाधानकारक ठरला आहे. त्यामुळे दिवाळी होताच साखर कारखान्यांच्या हंगामाच्या प्रारंभाची लगबग सुरू होईल.