शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत विझविली ऊसाला लागलेली आग

मनोज कुंभार
Friday, 20 November 2020

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. ठिणगी उसाच्या शेतात पडली व उसाला आग लागली. 

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील दापोडे येथील दौलत राजाराम शेंडकर यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. यावेळी बाजूला असलेल्या शेतातच शेतकरी काम करीत होते, या शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल गुरुवार (ता. १९ ) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. ठिणगी उसाच्या शेतात पडली व उसाला आग लागली. यावेळी बाजूच्या शेतात दुसरे शेतकरी काम करीत होते. त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांनी धाव घेत, पाण्याने आग विझवली. 

यावेळी उसाच्या शेजारी भात पिकाची मळणी सुरू होती, त्यामुळे या ठिकाणी जनावरांसाठी राहिलेला पेंडा भरपूर होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग भडकली असती मात्र शेतकऱ्यांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले.

२००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील

यावेळी शेतकरी दौलत  शेंडकर म्हणाले, ''मागील दोन वर्षांपूर्वी देखील माझ्या शेतात अशीच घटना घडली होती. त्यावेळी देखील माझा ऊस जळाला होता. यावेळी महावितरणकडे लाईन दुरुस्त करण्याची मागणी केली होती, परंतु या मागणीकडे महावितरण दुर्लक्ष केले आहे. वेळीच लाईन दुरुस्त केली असती, तर पुन्हा ही घटना घडली नसती.''

आता घरबसल्या करा वारसनोंदी

याबाबत महावितरणचे शाखा अभियंता सोनार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ''सदर घटनेचा ठिकाणी भेट दिली असून, येथील परिस्थितीची पाहणी केली व तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे.''

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sugarcane fire was extinguished by the farmers