बावधनमध्ये रविवारी नो व्हेईकल डे!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

आपण राहतो त्या भागात नागरिकांना शुद्ध हवा मिळाली पाहिजे. प्रदूषण कमी करता येईल, तेवढे कमी केले पाहिजे, अशी भूमिका फोरमने घेतली आहे. त्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी परिसरात कोणीही वाहन वापरणार नाही, असा संकल्प त्यांनी मांडला. एक नोव्हेंबरपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. आता त्यांचा दुसरा नो व्हेईकल डे येत्या रविवारी होत आहे. 

पुणे : प्रदूषण, वाहतूक कोंडी या सारख्या समस्यांबद्दल केवळ चर्चा न करता त्या सोडविण्यासाठी बावधन सिटीझन्स फोरमने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यातूनच त्यांनी येत्या रविवारी (ता. 6 डिसेंबर) परिसरात नो व्हेईकल डे राबविण्याचे ठरविले आहे. 

आपण राहतो त्या भागात नागरिकांना शुद्ध हवा मिळाली पाहिजे. प्रदूषण कमी करता येईल, तेवढे कमी केले पाहिजे, अशी भूमिका फोरमने घेतली आहे. त्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी परिसरात कोणीही वाहन वापरणार नाही, असा संकल्प त्यांनी मांडला. एक नोव्हेंबरपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. आता त्यांचा दुसरा नो व्हेईकल डे येत्या रविवारी होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या उपक्रमाची माहिती सर्व नागरिकांना व्हावी, यासाठी रविवारी सकाळी आठ वाजता बावधनमधील शिंदे पेट्रोल पंपापासून रामनगर, बावधनमधील विविध रस्त्यांवर जागरूकता फेरी काढण्यात येणार आहे. त्यात फोरमचे कार्यकर्ते, परिसरातील रहिवासी पायी किंवा सायकलवर सहभागी होणार आहेत. 

या उपक्रमाची माहिती देताना फोरमचे समन्वयक दुष्यंत भाटीया म्हणाले, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही नागरिकांना वाहने वापरू नका, असे आवाहन करीत आहोत. त्यासाठी फेसबुकवर बावधनसिटीझन्स हा ग्रूपही तयार केला आहे. पहिल्या रविवारी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता दुसऱया नो व्हेईकल डे साठीही प्रयत्न सुरू असून त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे.

आळंदीमध्ये 10 दिवस संचारबंदी? राज्य शासनाला पाठविला प्रस्ताव

या फोरमच्या समन्वयक दीपा प्रभू म्हणाल्या, भाजी खरेदी किंवा काही वस्तू आणायच्या असतील तर, 10 मीटर अंतर चालण्याची किंवा त्यासाठी सायकल वापरण्याची अनेकांची तयारी नसते. या लाईफ स्टाईलमध्ये बदल करण्यासाठी आम्ही नो व्हेईकल डे हा उपक्रम राबवित आहोत. किमान एक दिवस जरी वाहनांना आपण विश्रांती दिली तर, प्रदूषणाची समस्या नक्कीच कमी होईल. 

फेसबुकवर बावधन सिटीझन्सच्या पेजवर परिसरातील नागरिक या उपक्रमात भाग घेण्यासाठी नोंदणी करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. सध्या सुमारे 60 नागरिकांनी नोंदणी करून येत्या रविवारी आम्ही वाहने वापरणार नाही, असे सांगितले आहे. जास्तीत जास्त नागरिक नोंदणी करून या उपक्रमात नक्कीच सहभागी होतील, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला. नजीकच्या काळात या उपक्रमाची संपूर्ण शहरात अंमलबजावणी व्हावी, असे आमचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.  

राज्यपाल कोश्यारी यांनी दिला दहावीच्या विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र; म्हणाले...

100 सोसायट्या होणार सहभागी 
बावधन सिटीझन्स फोरमशी परिसरातील सुमारे 100 सोसायट्या संलग्न आहेत. त्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोचविण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. तसेच परिसरातील वाहतूक कोंडी, खड्डे, फलक नसणे आदी समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचे गट तयार करण्यात आले आहेत. ते गट महापालिका, अथवा पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहेत. तसेच कचऱयाची समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकाकडील थर्माकोलचे संकलन करून त्याचा फेरवापर करण्यासाठीही फोरम पुढाकार घेते, असेही भाटिया यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday No Vehicle Day in Bawadhan