कँन्टोन्मेट : बागवेंवर सुनील कांबळे यांची आघाडी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

Vidhan Sabha 2019 : कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार व महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे यांनी 2332 मते मिळवून बाजी मारली आहे.  कांबळे यांनी 284 मतांनी बागवेंवर आघाडी घेतली आहे. 

Vidhan Sabha 2019 : पुणे शहरात कमी मतदारसंख्या असलेल्या कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार व महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे यांनी 2332 मते मिळवून बाजी मारली आहे.  कांबळे यांनी 284 मतांनी बागवेंवर आघाडी घेतली आहे. 

 काँग्रेसचे उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना 2048 मते, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे यांना 1419 इतकी मते, तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनीषा सरोदे यांना 311 मते मिळाली आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात होत असलेली ही लढत अत्यंत चुरशीची ठरली आहे. 

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019  
भाजपने विद्यमान आमदार व माजी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना यावेळी उमेदवारी नाकारली. त्यांचे भाऊ सुनील कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर, पुणे कॅन्टोन्मेंट या राखीव मतदारसंघातून 2009 मध्ये बागवे निवडून आले. त्यापूर्वी ते पर्वती मतदारसंघाचे आमदार होते. दिलीप कांबळे यांनी 2014 च्या निवडणुकीत बागवे यांचा पराभव केला होता. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019
या मतदारसंघात अटीतटीची लढत झाल्याने, दोन्ही पक्षांनी त्यांची ताकद पणाला लावली आहे. भाजपने प्रचाराच्या शेवटच्या कॉंग्रेसच्या सदानंद शेट्टी, रशीद शेख, सुधीर जानजोत या माजी नगरसेवकांना पक्षात घेत त्यांची ताकद वाढविली. एकूण 43.29 टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघात 28 उमेदवार असल्यामुळे येथे मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार असून अखेर कोणी बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Kambale Leads in pune Cantonment for Maharashtra vidhan Sabha 2019