वडगाव शेरी : राष्ट्रवादीचे सुनिल टिंगरे आघाडीवर ; Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

Election Results 2019 : वडगाव शेरी मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांना इतके 7095 यांना इतकी मते मिळाली, तर भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी 4845 मते मिळवली आहेत. सुनिल टिंगरे यांनी 2250 मतांनी आघाडी घेतली आहे.  

Vidhan Sabha 2019 : पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच 'फाइट' होणार आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांना 7095 यांना इतकी मते मिळाली, तर भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांना 4845 मते मिळवली आहेत. सुनिल टिंगरे यांनी 2250 मतांनी आघाडी घेतली आहे.  

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019 
काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, अशी ओळख वडगाव शेरीची आहे; जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यात मुख्यत्वे लढत होत आहे. भाजपने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापू पठारे यांना भाजपमध्ये प्रवेश देत पक्षाची बाजू बळकट केली. या तिघांमध्येच 2014 मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत मुळीक निवडून आले होते. त्यावेळी टिंगरे शिवसेनेकडून निवडणूक लढवित होते. या मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालिन आमदार बापू पठारे हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. टिंगरे व पठारे यांच्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी स्पर्धा होती. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019
यंदा येथे निम्मे मतदान झाल्याने विजयाचा गुलाल उधळण्यासाठी उमेदवारांना किमान लाखाचा टप्पा गाठावा लागेल. हे मतांचे गणित जुळवणार कोण जुळवणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Tingray of NCP is leading in Maharashtra Vidhan Sabha 2019