पुणे महापालिकेच्या पुरवणी अंदाजपत्रकाबाबत मोठा खुलासा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

-महापालिकेचे पुरवणी अंदाजपत्रक तीन ते साडेतीन हजार कोटींचे? 
-महापालिका प्रशासनाकडून पुरवणी अंदाजपत्रकासाठी हालचाली सुरू.

पुणे : लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पुणे महापालिका आयुक्तांनी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पाचा फेरआढावा घेण्याच्या हलचाली सुरू केल्या आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार येत्या काही दिवसांत हा आढावा घेऊन पुरवणी बजेट सादर करण्यात  आहे. हे पुरवणी बजेट सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांपर्यंतचे असेल, असा अंदाज महापालिकेच्या खाते प्रमुखांकडून व्यक्त केला जात आहे. 

- पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!

महापालिकेच्या वतीने दरवर्षी एप्रिल महिन्यात अर्थसंकल्प सादर केला जातो. चालू वर्षी 7 हजार 400 कोटी रुपयांचे अर्थसंकल्प महापालिकेकडून मांडण्यात आला आहे. परंतु मार्च महिन्यात पुणे शहरात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. तर 23 मार्चपासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. राज्य सरकारकडून हा लॉकडाउन चार वेळा वाढविण्यात आला. त्यांची मुदत 30 मे रोजी संपुष्टात आली. शहरात अद्यापही काही भागात हा लॉकडाउन तीस जून पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर देखील झाला आहे. 

- Big Breaking : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली घोषणा!

एप्रिलपासून चालू वर्षी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरू होते. परंतु एप्रिल आणि मे हे दोन्ही महिने लॉकडाउनमध्ये गेले. त्यामुळे पहिल्या दोन महिन्यात महापालिकेला मिळकत करातून जवळपास सहाशे ते सातशे कोटी रुपये मिळतात. तर बांधकाम विकसन शुल्कातून मिळणारा निधी वेगळाच. परंतु लॉकडाउनमुळे मिळकत कराचे उत्पन्न जेमतेम चारशे कोटी रुपयांपर्यंत केले आहे. तर बांधकाम विकसन शुल्कापोटी फारसा महसूल मिळालेला नाही. लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल झाला असला, तरी शहरातील सर्व व्यवहार सुरळीत होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्‍यता आहे. या सर्व गोष्टींचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य सरकारने गेल्या महिन्यात 33 टक्केच रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पाचा फेरआढावा घेण्यास सुरवात केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्यासाठी सर्व खाते प्रमुख आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून आवश्‍यक त्याच कामांची यादी मागविण्यात आली आहे. जी कामे सुरू असून अर्धवट राहिली आहेत. त्याच कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये कामांची वर्गवारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य, घनकचरा आणि पाणी पुरवठा या संदर्भातील कामांनाच प्राधान्य देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जी अनावश्‍यक कामे आहेत. त्यांना पूर्णपणे बंदी घालण्याच्या सक्त सूचना आयुक्तांनी दिल्या असल्याचे खातेप्रमुखांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

- पुणेकरांनो सावधान : पुढचे चार दिवस धोक्याचे, हवामान खात्यानं दिलाय इशारा

राज्य सरकारने प्रत्येक विभागाला दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 33 टक्केच बजेट खर्ची करण्यास परवानगी देण्यात आली. राज्य सरकारच्या सूचना विचारात घेतल्या तर पुढील दहा महिन्यात महापालिकेला मिळकत कर, बांधकाम विकसन शुल्क, शासकीय अनुदान ग्राह्य धरून किमान तीन ते साडेतीन हजार कोटी पर्यंतचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज प्रशासनाकडून मांडण्यात येत आहे. प्रशासनाचे बजेट मांडताना आयुक्तांनी सहा महिन्यांनी पुरवणी अंदाजपत्रक मांडण्याची घोषणा देखील केली होती. त्यानुसार प्रशासनाकडून आता पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. या पुरवणी अंदाजपत्रकात सुशोभीकरण, पिशव्या, बकेट, बेंच वाटप, पदपथ दुरुस्ती, गल्लीबोळ क्रॉंकिटीकरण, ड्रेनेज लाइन, कमानी , समाजमंदिर अशा अनेक कामांना यंदा फाटा द्यावा लागणार आहे. तसेच नगरसेवकांसाठी असलेल्या तरतुदीत देखील मोठी कपात करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले 

क्षेत्रीय कार्यालयाच्या कामांवरही नियंत्रण 
क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर वीस लाखांपर्यंतच्या कामांना मंजुरी दिली जाते. त्यालाही बंधने आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन लाख व त्यापुढील कोणत्याही कामे करताना यापुढे त्यांची एकत्रित यादी तयार करावी. ती यादी महापालिका आयुक्तांकडे सादर करावी. आयुक्त त्याची छाननी करून आवश्‍यक असेल, तरच त्या कामांना मंजुरी देतील. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर चालणाऱ्या मनमानी कारभाराला यामुळे लगाम लागणार आहे. 

- पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!

महापालिकेचे आर्थिक वर्ष सुरू होऊन आताशी दोन महिने झाले आहेत. अद्यापही दहा महिने शिल्लक आहे. महापालिकेचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी विविध मार्ग असून त्यांचा विचार देखील सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने घाई करू नये, उत्पन्न नक्कीच वाढले आणि मूळ अंदाजपत्रकाची ची अंमलबजावणी करण्यात येईल. - हेमंत रासने ( अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The supplementary budget is around three thousand crore rupees