राष्ट्रवादीचे नेते म्हणतात, "कोरोनाच्या लढाईत राजकारण नको...' 

supriya amol.
supriya amol.

पुणे : ""आपल्याला पुढची दोन ते तीन वर्षे खबरदारी घेत कोरोनाचा सामना करावा लागणार आहे. आपल्याला कोरोना एक्‍झिट प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनेही पावले उचलली गेली पाहिजेत. हे करत असताना त्यात राजकारण आले नाही पाहिजे,'' असे मत खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी व्यक्त केले. 

सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी कोरोना, त्याविषयी घ्यावयाची काळजी, लोकांच्या मनात वाढत असलेली भीती, परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व कोरोना एक्‍झिट प्लॅन आदी मुद्द्यांवर इन्स्ट्राग्राम लाइव्हद्वारे संवाद साधला. या इन्स्ट्राग्राम चर्चेत त्यांनी हे मत व्यक्त केले. ""शेतकरी वर्गाचेही लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र, लॉकडाउनमध्ये अनेक तरुण शेतकऱ्यांनी शेतकरी ते ग्राहक, असा प्रयोग करून शेतमाल विक्री केली. हा प्रयोग लॉकडाउन नंतर अधिक व्यापक करणे आवश्‍यक आहे,'' असे मतही या चर्चेत व्यक्त करण्यात आले. 

इतर आजारही शून्यावर आणा : सुळे 
सुळे म्हणाल्या, ""डॉक्‍टर, पोलिस आणि समाजातील विविध घटक कोरोनाशी लढत आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून आपलीही काहीतरी जबाबदारी आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांना घेऊन पुढच्या पाच वर्षांचा आरोग्य प्लॅन आखला पाहिजे. कोरोनाबरोबर इतर आजारही महाराष्ट्रात शून्यावर आणणे, ही आपली जबाबदारी आहे.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   

लॉकडाउनचा एक्‍झिट प्लॅन हवा : कोल्हे 
डॉ. कोल्हे म्हणाले, ""आपल्याकडे लॉकडाउन एक्‍झिट प्लॅन अजून तयार नाही. हा लॉकडाउन एक्‍झिट प्लॅन तयार होणे आवश्‍यक आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षे कोरोना आपल्या आजूबाजूला असणार आहे, ही मानसिकता करून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. त्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, या गोष्टी आपल्याला जीवनशैलीतील बदल म्हणून स्वीकाराव्या लागतील. कोरोना आपल्याकडून पसरणार नाही आणि दुसऱ्याकडून आपल्याला होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून शासन आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे.

'' 

कंपनी व कामगारांनी एकमेकांना सांभाळावे 
""महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. आता या जागी महाराष्ट्रातील मुलांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, हे पाहणे आवश्‍यक आहे. लॉकडाउनमुळे सर्वांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंपनी मालक आणि कामगार यांनी या परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. स्थलांतरित कामगारांना महाराष्ट्रातील अनेक जणांनी स्वयंस्फूर्तीने जी मदत केली, ती वाखाणण्याजोगी आहे. या लॉकडाउनमध्ये हातावर पोट असणारे आणि मध्यमवर्गीय जास्त भरडले गेले आहेत. त्या वर्गाला आता काम सुरू करणे गरजेचे आहे,'' असे मतही या चर्चेत व्यक्त करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com