esakal | उद्योग क्षेत्राच्या अडचणींबाबत सर्वेक्षण - मराठा चेंबर ऑफ कॉमर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Industry

यापूर्वी देखील आम्ही अशाप्रकाचे सर्वेक्षण केले होता. त्यात 500 उद्योजकांनी सहभाग घेतला होता. आर्थिक तरलता, घटलेली मागणी, उशिराने येणारी देणी आदी अडचणी त्यांना येत होत्या. त्याबाबत आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्यातून काही प्रश्न सुटले आहेत. नुकत्याच झालेल्या घोषणांमध्ये यातील काही मुद्दे देखील आहेत. यातून एमएसएमईच्या अडचणी समजून घेण्यात येत आहेत. त्यानुसार आमच्या मागण्या सरकारपर्यत पोहचविण्यात येतील.
- प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआए

उद्योग क्षेत्राच्या अडचणींबाबत सर्वेक्षण - मराठा चेंबर ऑफ कॉमर्स

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील किती सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग (एमएसएमई) सुरू झाले आहेत? त्यांना नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत आणि त्यावर काय मार्ग काढला जाऊ शकतो, याचा अभ्यास करण्यासाठी ''मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ऍग्रिकल्चर'' (एमसीसीआए) यांच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र पुरेसे कर्मचारी, वितरणाची साखळी आणि कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने अजूनही अनेक उद्योग-व्यवसाय सुरू झालेले नाहीत. त्यामुळे एमएसएमईला नेमक्या कोणत्या अडचणी भेडसावत आहेत, याचा आढावा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे.

पुणेकरांना जबर धक्का : दिवसभरातील रुग्णसंख्या पोहोचली तीनशेपर्यंत!

उद्योगाचे स्वरूप काय आहे? सध्या किती कामगार उपलब्ध आहेत? एकूण कामगारांची संख्या किती? कंपनी नेमकी कोणत्या भागात आहे? सध्या किती टक्के उत्पादन सुरू आहे? व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालवण्यात काय अडचणी येत आहेत? अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेले पॅकेज, नवीन सुविधा आणि पीएफबाबतचे निर्णय आपल्यास उपयोगी ठरू शकतात का? असे विविध प्रश्न सर्वेक्षणामध्ये विचारण्यात आले आहेत.

महत्त्वाची बातमी : रेशन कार्ड नसले तरी मिळणार ५ किलो तांदूळ, तोही मोफत

यात आतापर्यंत सुमारे 100 उद्योजकांनी आपले मत नोंदवले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी काय करता येईल, याबाबत उपाययोजना प्रशासनाला सुचविण्यात येणार आहेत, अशी माहिती चेंबरकडून देण्यात आली.

सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी www.mcciapune.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन चेंबरकडून करण्यात आले.