esakal | उरुळी कांचन हद्दीत दहा दिवसांच्या कालावधीत दोघांचा संशयास्पद मृत्यू?
sakal

बोलून बातमी शोधा

police.jpg

उरुळी कांचन हद्दीत दहा दिवसांच्या कालावधीत एका महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदनाशिवाय अंत्यसंस्कार. 

उरुळी कांचन हद्दीत दहा दिवसांच्या कालावधीत दोघांचा संशयास्पद मृत्यू?

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) परीसरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत, दोन वेगवेगळ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची चर्चा आहे. वरील दोन्ही घटनेत मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या अपरोक्ष दोघांच्यावरही शवविच्छेदनाशिवाय तातडीने अंत्यसंस्कार केल्याने, दोघांच्याही मृत्यूबद्दल परीसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीलगत टिळेकरवाडी परीसरात दहा दिवसांपुर्वी कडबा कुट्टी मशिन चालू करण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एका तीस वर्षीय तरुणीचा दोन दिवसांपुर्वी संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची चर्चा आहे. दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी, दोन्ही घटनेत मृतांच्या नातेवाईकांनी अपरोक्ष व शवविच्छेदनाशिवाय तातडीने अंत्यसंस्कार केल्याची बाब पुढे आली आहे. या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी उरुळी कांचन परीसरातील नागरीकांनी केली आहे. 

याबाबत गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या टिळेकरवाडी य़ेथील शेतीमधील कडबा कुट्टी मशिन चालू करण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला होता. संबधित कामगाराचा मृत्यू नैसर्गिक नसल्याने, घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मृताच्या नातेवाईकांना तोंडी कल्पना देऊन, पोलिसांच्या परस्पर तेही शवविच्छेद न करता संबधित व्यक्तीवर तातडीने अंत्यसंस्कार केले होते.

तर दुसऱ्या घटनेत उरुळी कांचन परीसरातील एका तीस वर्षीय महिलेचा दोन दिवसांपुर्वी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. ही खबर उरुळी कांचन पोलिस चौकीत पोचण्यापुर्वीच, मृतांच्या नातेवाईकांनी संबधित तरुणीवर अंत्यसंस्कार केल्याची बाब पुढे आली आहे. वरील दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे मत उरुळी कांचन परीसरातील नागरीकांनी व्यक्त केले आहे. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

याबाबत महावितरणचे उरुळी कांचन येथील वरीष्ठ अधिकारी प्रदीप सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''दहा दिवसांपुर्वी टिळेकरवाडी य़ेथे कडबा कुट्टी मशिन चालू करण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला ही बाब खरी आहे. विजेचा धक्का लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची बाब समजताच, आमचे कर्मचारी जाण्यापुर्वीच संबधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्याचे समजले होते. याबाबत तक्रार न आल्याने, ही बाब आम्ही ही पोलिसांना कळवली नव्हती.'' 

दरम्यान याबाबत बोलताना साहय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी म्हणाले, ''उरुळी कांचन परीसरात मागिल दहा दिवसांच्या कालावधीत, दोन वेगवेगळ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची चर्चा पोलिसांच्याही कानावर आली आहे. उरुळी कांचन येथील तीस वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यूची माहिती घेण्याचे काम चालू आहे. याबाबतच्या सुचना पोलिस पाटील व खबऱ्यांना दिलेल्या आहेत. कडबा कुट्टी मशिन चालू करण्यासाठी मजूराचा मृत्यू विजेचा धक्का लागून झालेला असला तरी, त्याची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक होते. यामुळे वरील दोघांच्याही संशयास्पद मृत्युच्या कारणांचा तपास सुरु करण्यात आला आहे.''

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top