‘स्वॅब कलेक्‍शन सेंटर’ शहरात सुरूच राहणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

पुण्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे नव्या रुग्णसंख्येवरून दिसत असले तरी नागरिकांच्या चाचण्यांसाठी एकही ‘स्वॅब कलेक्‍शन सेंटर’ (सीसीसी) बंद होणार नसल्याचे महापालिकेने गुरुवारी स्पष्ट केले. पुढील सहा महिने चाचण्यांची व्यवस्था कायम राहणार आहे.

पुणे - पुण्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे नव्या रुग्णसंख्येवरून दिसत असले तरी नागरिकांच्या चाचण्यांसाठी एकही ‘स्वॅब कलेक्‍शन सेंटर’ (सीसीसी) बंद होणार नसल्याचे महापालिकेने गुरुवारी स्पष्ट केले. पुढील सहा महिने चाचण्यांची व्यवस्था कायम राहणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील कोरोना आटोक्‍यात येत आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. हे. नव्या रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटल आणि जम्बो कोविड केअर सेंटर पुरेसे ठरत आहेत. त्यामुळे विविध भागांतील ११ पैकी सात कोविड केअर सेंटर बंद करून आता चारच सेंटर सुरू ठेवण्यात आली आहेत. 

दुसरीकडे, महापालिकेच्या स्वॅब कलेक्‍शन सेंटरवर नागरिक चाचण्यांसाठी येत नसल्याने आणखी काही सेंटर बंद करण्याच्या हालचाली महापालिकेच्या पातळीवर होत्या; मात्र नागरिकांची गैरसोय होण्याची भीती असल्याने सर्व सेंटर सुरू राहणार आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी स्पष्ट केले.

पुणे : छाप्यावेळी हाती आलं घबाड; बड्या राजकीय व्यक्तीशी संबंधित कागदपत्रे पोलिसांच्या हाती 

नागरिकांच्या चाचण्या कमी
महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांसह १८ ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या केल्या जातात. त्यातून मार्च ते ऑगस्ट कालावधीत रोज ८ हजार नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. गेल्या दोन महिन्यांपासून तपासण्या अडीच ते तीन हजारांपर्यंत आल्या आहेत. त्यातही निम्म्या म्हणजे, दीड-पावणेदोन हजार तपासण्या खासगी लॅबमधून होतात. महापालिकेच्या सेंटरमध्ये फारसे लोक येत नसल्याने त्यातील चार-पाच सेंटर बंद करण्याची शक्‍यता होती.

पुणेकरांनो, उद्याने खुली होणार पण...; महापालिका आयुक्तांचा आदेश वाचाच 

शहरात डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवरची आरोग्य व्यवस्था सक्षम ठेवली जाणार आहे. पुढील काही महिने तरी ‘स्वॅब कलेक्‍शन सेंटर’ सुरूच ठेवण्यात येतील. खबरदारी म्हणून डिसेंबरपासून तपासण्या वाढविण्यात येतील. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swab collection center will continue in the city