Chandrakant Patil : स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्कारात' पुण्याला देशात 'टॉप फाईव्ह'मध्ये आणण्यासाठी योगदान द्या

पुणे महापालिकेच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे "स्वच्छ तंत्रज्ञान चॅलेंज' आणि "स्वच्छ पुरस्कार 2023' या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsakal

पुणे - स्वच्छ सर्व्हेक्षणात पुणे शहर देशात नवव्या स्थानावर आहे, आपल्या शहराला स्वच्छतेच्या बाबतीत 'टॉप फाईव्ह'मध्ये आणून देशात शहराचे नाव उंचावण्यासाठी नागरीकांनी महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

महापालिकेच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे "स्वच्छ तंत्रज्ञान चॅलेंज' आणि "स्वच्छ पुरस्कार 2023' या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमाचे ब्रॅंड ऍम्बेसेडर डॉ. सलील कुलकर्णी, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यावेळी उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथील घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे उद्धघाटन करण्यात आले.

पाटील म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेवून देशात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी, शहरात विविध प्रकारच्या स्पर्धा, उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे आपला परिसर, शहर, वसाहत, जिल्हा, राज्य व देश स्वच्छ होण्यास मदत होत आहे. "स्वच्छ सर्व्हेक्षणा'त पुणे शहर देशात नवव्या क्रमांकावर आहे, हि क्रमवारी उंचावून आपल्या शहराला देशात "टॉप फाईव्ह'मध्ये आणण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे.'

'पुण्याला चांगल्या उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे कचरा निर्मूलन तसेच व्यवस्थापनातही चांगले काम केले जात आहे. वाढती लोकसंख्या विचारात घेता शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होते. परंतु अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करुन जीवनाश्‍यक वस्तूंची निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील वसाहतीत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून खत आणि गॅस निर्मितीबरोबरच वीज निर्मिती करण्यात येत आहे. कचरा आज एक प्रकारची मालमत्ता बनली आहे. रोजगाराचे साधन बनले आहे. कचरा निमिर्तीपासून ते कचरा निर्मूलन पर्यंतचा प्रवास विचारात घेता पुणे महानगरपालिका अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यावर कार्य करीत आहे.' असेही पाटील यांनी सांगितले.

कुमार म्हणाले, 'पुणे शहराच्या नव्या हद्दवाढीमुळे लोकसंख्या सुमारे 62 लाखापर्यंत पोचली आहे. त्यातुन शहरात दररोज दोन हजार 200 टन कचरा निर्माण होतो. महानगरपालिकेचे 12 हजार कर्मचारी शहर स्वच्छतेचे काम करीत आहेत. याबरोबरच अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन महानगरपालिका कचऱ्यावर 100 टक्के प्रक्रिया करण्याचे काम करते. 100 किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्था, हॉटेल आदीनी त्यांच्या स्तरावर कचरा निर्मूलन करण्याची प्रक्रिया करावी.'

'कचऱ्याची विल्हेवाटीसाठी पुणे महानगर पालिका अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. पुणे शहरातील नागरिकांनी आपल्या घरात, परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावेत.'

- डॉ. सलील कुलकर्णी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com