गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल झाली आहेत. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक भाव मिळत आहे.

मार्केट यार्ड - गोड रसाळ द्राक्षे हंगाम सुरू होण्यापूर्वीच बाजारात दाखल झाली आहेत. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात दररोज एक ते दीड टन आवक होत आहे. द्राक्षास गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक भाव मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारात सध्या बारामती तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून आवक होत आहे. येत्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून आवक सुरू होणार आहे. घाऊक बाजारात जम्बो (काळा रंग) द्राक्षास दहा किलोस १३०० ते १६०० रुपये, तर सोनाका (हिरवा रंग) द्राक्षास चार किलोस ३५० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तसेच या वर्षी वातावरण चांगले राहावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात 

वास्तविक फेब्रुवारी ते मे असा द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. त्यानुसार येथील बाजारात द्राक्षे दाखल होत आहेत. लांबलेल्या पावसाचा काहीसा फटका पिकाला बसला आहे. सध्या फळाला आंबट-गोड चव आहे. येत्या काही दिवसात आवक वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षीही याच वेळी हंगामपूर्व द्राक्षाची आवक सुरू झाली होती. मागील दोन वर्षात हवामान बिडाघाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या धमक्‍यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील

सध्या बाजारात दाखल होणाऱ्या द्राक्षांना पुणे शहर परिसरासह पिंपरी चिंचवड येथून मागणी आहे. विशेषत: महाबळेश्‍वर, वाई, लोणावळा आणि कोकणातील पर्यटन भागातून द्राक्षांना जास्त मागणी आहे. परराज्यांत गोवा, गुजरात आणि कोलकता येथे मालाची निर्यात होत आहे.
- अरविंद मोरे, द्राक्षाचे व्यापारी, मार्केट यार्ड

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sweet juicy grapes enter the market before the start of the season