महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बाजारात रताळ्याची आवक

Sweet Potato demand increase in market pune
Sweet Potato demand increase in market pune

मार्केट यार्ड : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तरकारी विभागात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी मिळत आहे. गावरान रताळ्याला घाऊक बाजारात किलोस १५ ते १६ रुपये भाव मिळत आहे. मागील वर्षी १८ ते २० रुपये भाव होता.बाजारात स्थानिक भागातून १५ ते २०, तर कर्नाटक येथून ६ ते ७ गाड्यांची आवक झाली आहे. कर्नाटक आणि राज्यातील काही भागांतून आलेल्या सटाणा रताळ्याला किलोस १० ते १२ रुपये भाव मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजारात सांगली जिल्ह्यातील कराड, मलकापूर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, धुळे आणि जालना भागातून येथून रताळ्याची आवक होत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली. गावरान रताळी चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या मालाला जास्त मागणी असते. कर्नाटक येथून आलेली रताळी आकाराने मोठी, तुरट असतात. त्यामुळे त्यांना गावरानच्या तुलनेत कमी भाव असतो.

गजा मारणे मिरवणूक प्रकरण : गुंड समर्थकांचं फोन रेकॉर्ड पोलिस तपासणार

''बाजारात मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्याने दोन वर्षांत तुलनेत कमी भाव मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी गावरान रताळ्याला किलोस २५ ते ३० रुपये भाव मिळत होता.''
- अमोल घुले, उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com