पुण्यात स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने केले तरुणीसमोर अश्लिलवर्तन

swiggy delivery boy objectionable behavior in front of girl student
swiggy delivery boy objectionable behavior in front of girl student

पुणे : स्विगी कंपनीकडून ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविलेल्या तरुणीसमोर खाद्यपदार्थ घेऊन आलेल्या कंपनीच्या डिलीव्हरी बॉयने अश्‍लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये संबंधीत कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

याप्रकरणी डेक्कन परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुत स्विगी कंपनीच्या डिलीव्हरी बॉय विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही नामांकीत महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तरुणीला भुख लागल्याने तिने ऑनलाईन माध्यमाद्वारे खाद्यपदार्थ मागविले.
- पुलवामा हल्ल्याबाबत आता नवी माहिती समोर; हल्लेखोराने...

त्यानुसार, स्विगी कंपनीचा कर्मचारी खाद्यपदार्थ घेऊन तरुणीच्या घरी आला. तरुणीने दरवाजा उघडल्यानंतर संबंधीत कर्मचाऱ्याने तरुणीकडे पाहून अश्‍लिल वर्तन केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तत्काळ दरवाजा बंद करुन स्विगी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे तरुणीने या प्रकरणी थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार, तरुणीने डेक्कन पोलिसांकडे संबंधीत कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

- आमचा अर्थसंकल्प लोकाभिमुख; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दावा
 

"तरुणीबाबत घडलेला प्रकार गंभीर असून त्याबाबत तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. स्विगी कंपनीच्या संबंधीत कर्मचाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटवून शोध घेण्याचे काम सुरू आहे.''
- दिपक लगड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे
- राम मंदिर उभारणीसाठी उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com