Video : स्विगीच्या मनमानी कारभारामुळे डिलिव्हरी बॉईज हैराण; कामबंद आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

लॉकडाऊन काळात बंद असलेला बॉईजचा व्यवसाय सध्या काहीसा वाढला आहे. चांगला रोजगार मिळत असल्याने अनेक तरुणांनी डिलिव्हरी बॉईज म्हणून काम करण्यास सुरवात केली आहे.

पुणे : फूड डिलिव्हरी केल्यानंतर त्याबदल्यात मिळणारा मोबदला वाढवून देण्यासाठी स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजने सोमवारी (ता.२१) कामबंद आंदोलन केले. शहरातील सुमारे साडेचार हजार बॉईज यात सहभागी झाले होते. त्यामुळे काही ऑडर्सच्या डिलिव्हरी मिळण्यास उशीर झाला होता.

लॉकडाऊन काळात बंद असलेला बॉईजचा व्यवसाय सध्या काहीसा वाढला आहे. चांगला रोजगार मिळत असल्याने अनेक तरुणांनी डिलिव्हरी बॉईज म्हणून काम करण्यास सुरवात केली आहे. मात्र सध्या डिलिव्हरीसाठी दिले जाणारे पैसे 70 रुपयांवरून अगदी 15 रुपयांपर्यंत करण्यात आले आहेत. 12 तास काम केल्यानंतरही केवळ 400 ते 500 रुपये मिळत असल्याने डिलिव्हरी बॉईज हैराण झाले आहेत. त्यामुळे पैसे वाढवून देण्याची मागणी करीत त्यांनी काम बंद ठेवले.

Breaking : पुण्यात मोठा शस्त्रसाठा जप्त; ६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

याबाबत डिलिव्हरी बॉय अमित दाभाडे यांनी सांगितले की, ''पूर्वी आम्हाला दिवसाला एक ते दीड हजार रुपये मिळत होते. आता 500 रुपये देखील मिळत नाहीत. डिलिव्हरीचे दर कमी केल्याने आमच्या हाती खूप कमी पैसे राहतात. त्यातून कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्‍न आहे. सुरवातीला आम्हाला एका डिलिव्हरीमागे 70 रुपयांपर्यंत पैसे मिळत होते. आता तीच रक्कम अगदी 15 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दर वाढवून द्यावे अशी आमची मागणी आहे. स्विगीचे शहरात 25 ते 27 हजार डिलिव्हरी बॉय आहेत. त्यांच्या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे.''

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे प्रकल्पाला झाला विलंब; भाजप नेत्याचा आरोप​

भत्ते देखील बंद झाले :

जुना कर्मचारी आहे म्हणून अनेक डिलिव्हरी बॉईजला लॉकडाऊन पूर्वी भत्ते दिले जात होते. सहा महिने कार्यरत असलेल्या बॉईजला 250, एक वर्ष झालेल्याला 500, दीड वर्ष 750 आणि दोन वर्षांपासून कामावर असलेल्यांना 1 हजार रुपये प्रत्येक आठवड्याला दिले जात होते. मात्र, आता ती रक्कम देणे देखील बंद करण्यात आल्याचे बॉईजने सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swiggy delivery boys staged a strike to demand higher wages