पिंपरी पालिकेकडून पीएमपीला सहा कोटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

संचलन तुटीपोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीला सहा कोटी रुपये देण्यास स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. 5) मंजुरी दिली.

पिंपरी - संचलन तुटीपोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीला सहा कोटी रुपये देण्यास स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. 5) मंजुरी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे महापालिका परिवहन (पीएमटी) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन (पीसीएमटी) यांचे तेरा वर्षांपूर्वी एकत्रीकरण करून पीएमपीएमएल अस्तित्वात आली. त्या वेळच्या करारानुसार, दोन्ही महापालिकांना संचलत तुटीपोटी पीएमपीला अनुक्रमे 60 टक्के आणि 40 टक्के रक्कम द्यायचे ठरले आहे. त्यानुसार 2018-19 ची अंदाजे संचलन तूट 247 कोटी चार लाख 67 हजार 793 रुपये गृहीत धरली आहे. त्याचा चाळीस टक्के हिस्सा अर्थात 98 कोटी 81 लाख 87 हजार 117 रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरमहा पीएमपीला द्यायचे आहे. त्याचा फेब्रुवारीचा हिस्सा आठ कोटी 23 लाख रुपये देणे आहेत. त्यापैकी सहा कोटी रुपये देण्यास स्थायी समिती सभेने मंजुरी दिली. 

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sxi crore to PMP from PCMC