Talathi Recruitment : तलाठीभरती चौकशीसाठी युवक कॉंग्रेसचे पुण्यात आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, या मागणीसाठी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात आंदोलन करण्यात आले.
Talathi Recruitment exam scam agitation
Talathi Recruitment exam scam agitationsakal

पुणे - तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, या मागणीसाठी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज पुण्यात आंदोलन करण्यात आले. एमपीएससीच्या परीक्षेतील जागा वाढविण्याची मागणीही करण्यात आली. लाक्षणिक उपोषणाला परवानगी मिळाली नसल्याने युवक कॉंग्रेसने आक्रमक पवित्र घेत घटनास्थळी आंदोलन केले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

आंदोलनाबद्दल सांगताना प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, ‘तलाठीभरतीच्या निकालात पुन्हा गोंधळ झाला आहे. मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे वारंवार समोर आले आहे. यामुळे प्रामाणिकपणे वर्षोनुवर्षे अभ्यास करणाऱ्या स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी होत आहे.’

तर माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन सांगतात, ‘स्पर्धा परीक्षेबाबत गांभिर्याने घेत सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. सरकारच्या ढिसाळ व भ्रष्ट कारभारा विरोधात परीक्षार्थींना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. युवक कॉंग्रेस विद्यार्थ्यांसाठी राज्यभर हा लढा लढणार आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com