पुणे : महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा देणार; चित्रा वाघ

तळेगाव ढमढेरे येथे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सत्कार समारंभ
Talegaon Dhamdhere Fight against atrocities against women Chitra Wagh
Talegaon Dhamdhere Fight against atrocities against women Chitra Waghsakal

तळेगाव ढमढेरे : दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढतच असून, अन्याय करणाऱ्यांना भाजपतर्फे जशास तसे उत्तर देऊ, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढा चालूच ठेवणार आहे असा इशारा प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला आहे. तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सत्कार समारंभात चित्रा वाघ बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या सेवापुर्तीनिमित्त पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे आणि शिरूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित खैरे यांच्यातर्फे सेवा सुशासन व गरीब कल्याण पंधरवडा अंतर्गत आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा " कृतज्ञता सन्मान सोहळा" आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व महिलांना छत्री, बॅग, किचन लिक्वीड भेट देऊन व आकर्षक फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळण्यासाठी तसेच महिलांना योग्य न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महागाईतही महिलांसाठी उज्वला गॅस सबसिडी चालू असून, किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळत आहेत. कोरोनाची लस सर्वांना मोफत दिली आहे. कोरोनाकाळात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. असे असले तरी राज्यात त्यांना हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे. "मानधन नको, वेतन पाहिजे" ही त्यांची मागणी शासनाने मान्य करावी. यावेळी सर्व महिलांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

राज्यातील महाविकास आघाडीचे नेते जनतेची कामे सोडून मुख्यमंत्री कोण होणार याचीच सध्या चर्चा करीत आहेत. आगामी काळात महिलांवर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत त्यांना भाजपतर्फे जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे दोन सदस्य निवडून येणार आणि तिसरा पण निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच पुढच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महविकास आघाडीच्या कारभारावर त्यांनी कडाडून टीका केली. यावेळी भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजय पाचंगे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग व विक्रम पाचुंदकर, अड. सुरेश पलांडे, श्रीकांत सातपुते, संदीप ढमढेरे, राहुल गवारे, संतोष करपे, पंडाभाऊ गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, रवींद्र दोरगे, माऊली बहिरट, नवनाथ भुजबळ, प्रमिला दरेकर, रेश्मा शेख, वर्षा काळे, अनघा पाठक, मिनाक्षी ढमढरे, मोहिनी मांढरे, शालन राऊत, कोमल कातोरे, तुळशीदास दुंडे, बाबासाहेब दरेकर, अशोक हरगुडे, सुशील सैंदाणे, सुरज चव्हाण, पप्पू शेलार, रघुनंदन गवारे, अमोल गवारे, पांडुरंग नरके, दिलीप शेलार, दत्ताभाऊ दरेकर, विलास आदक, रावसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. रघुनंदन गवारे यांनी सूत्रसंचालन केले. शिरूर तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com