तळजाईमाता मंदिर नवरात्रोत्सवात भाविकांसाठी राहणार बंद

अजित घस्ते
Friday, 16 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण साध्या पद्धतीने साजरे केले जात आहे. तळजाई टेकडीवरील श्री तळजाई माता देवीचे दर्शन नवरात्रोत्सवात भाविकांसाठी बंद राहणार असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन श्री तळजाईमाता ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी केले आहे. 

सहकारनगर (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण साध्या पद्धतीने साजरे केले जात आहे. तळजाई टेकडीवरील श्री तळजाई माता देवीचे दर्शन नवरात्रोत्सवात भाविकांसाठी बंद राहणार असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन श्री तळजाईमाता ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी केले आहे. 

सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात​

तळजाई टेकडीवरील ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे तीन देवींचे मंदिर असणारे ठिकाण म्हणजे तळजाई माता मंदिर. या ठिकाणी तुळजाभवानी, पद्मावती आणि तळजाई माता अशी तीन देवींच्या मूर्ती आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार! 

नवरात्रोत्सव काळात या ठिकाणी शहर तसेच राज्यातून नवरात्रोत्सव निमित्ताने तळजाई मातेच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीचे दर्शन बंद राहणार आहे, परंतु धार्मिक विधी नित्यनियमाने केले जाणार असल्याचे थोरात यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taljaimata temple will be closed for devotees during Navratri festival