पुणे : डीएसके यांच्या सुनेला अटकपूर्व जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांची सून तन्वी कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी हा आदेश दिला. मात्र, डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर कुलकर्णी दांपत्य आणि सई वांजपे यांनी जामीन मिळावा म्हणून तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनीदेखील जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यांच्या अर्जावर युक्तिवाद न केल्याने त्यावर तूर्तास निर्णय होणार नाही.

पानिपतच्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanvi Kulkarni Daughter in Law of DSK gets Anticipatory bail

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: