पुण्यातील उच्चभ्रू गर्दुल्ये...कोकेनचा झोल...टांझानियाचा बहाद्दर अन्...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

उच्चभ्रू गर्दुल्यांना कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टांझानियाच्या (दक्षिण आफ्रीका) नागरीकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पुणे : उच्चभ्रू गर्दुल्यांना कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टांझानियाच्या (दक्षिण आफ्रीका) नागरीकाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून कोकेनसह साडे तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. संबंधीत आफ्रीकन नागरीकाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. 

पुण्यातील जम्बो व्हेंटिलेटरवर; ‘लाइफलाइन’ ला ‘पीएमआरडीए’ची नोटीस

जेम्स हिलरी ऍसी (वय 27 , रा. कोंढवा बुद्रुक, मुळ रा. मवांझा, टांझानिया, दक्षिण आफ्रिका) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे ( पूर्व) वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय विजय टिकोळे हे त्यांच्या पथकासह कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे गस्त घालत होते. त्यावेळी कोंढवा-येवलेवाडी रस्त्यावरील मरळनगर येथील एका दुकानासमोर दुचाकीवर आफ्रीकन व्यक्ती थांबला असल्याचे व त्याच्या हालचाली संशयास्पदरीत्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यास ताब्यात घेऊन प्रश्‍न विचारल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 55 ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडून कोकेनसह मोबाईल व दुचाकी असा तीन लाख 62 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

पुण्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतला धसका 

दरम्यान, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या व्यक्तीकडून अंमली पदार्थ विक्री केव्हापासून व कोणाकोणाला केली जात आहे. याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बापु रायकर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Tanzanian citizen was arrested for selling cocaine