एमबीए सीईटीत टाॅपरचे प्रमाण घसरले; फक्त चौघांनाच...

mba1.jpg
mba1.jpg

पुणे : राज्य सामाईक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमबीए/एमएमएस पदव्युत्तर प्रवेश परीक्षेमध्ये १५९ गुण घेऊन ठाण्यातील शशांक प्रभू हा विद्यार्थी राज्यात प्रथम आला आहे. यंदा फक्त चौघांना १५० पेक्षा जास्त गुण मिळाले आहे. गेल्यावर्षी २० विद्यार्थ्यांचा समावेश होता.

मास्टर इन बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन (एमबीए) आणि मास्टर इन मॅनेजमेन्ट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी १४ आणि १५ मार्च रोजी  प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्य भरातून १ लाख २४ हजार २३६ जणांनी अर्ज भरला होता. त्यापैकी १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी राज्यातील १३५ व राज्याबाहेरील १३ केंद्रावर परीक्षा दिली होती. त्याचा निकाल सीईटी सेलने आॅनलाईन जाहीर केला. यामध्ये ठाण्याच्या शशांक प्रभू यास १५९, मुंबईच्या अंकीत ठक्कर १५५, लखनउच्या आकांक्षा श्रीवास्तव हिस १५३ तर मुंबईच्या आदित्य श्रीधर यास १५० या चौघांना १५० पेक्षा जास्त गुण आहेत. तर १४६ ते १५९ असे गुण घेणाऱ्या १६ विद्यार्थ्यांना ९९.९९ पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. तर ४८ जणांना शून्य गुण मिळाले आहेत. 

राज्यातील एमबीए इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य असते. जास्तीत जास्त गुण घेऊन विद्यार्थी राज्यातील महत्वाच्या इन्स्टिट्यूटमध्ये शासकीय जागांवर प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण ज्यांना असा प्रवेश मिळत नाहीत असे विद्यार्थी हे संस्थेच्या कोट्यातून जास्त पैसे मोजून प्रवेश घेतात. त्यामुळे बरेच जण केवळ औपचारिकता म्हणून परीक्षा देतात. २०२०-२१ च्या निकालाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी गुणवत्ता कमी झाल्याचे दिसून येत आहे.

 पुण्यातील इतर बातम्यासाठी येथे- क्लिक करा

"गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात १५० पेक्षा जास्त गुण घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र एमबीएच्या प्रवेश हे पर्सेंटाईल गुणांवर होतात. त्यामुळे कमी गुण मिळाल्याचा तसा फरक पडणार नाही."
संदीप कदम, आयुक्त, सीईटी सेल. 

एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षाचा तुलनात्मक तक्ता

प्राप्त गुण        २०२०-२१ विद्यार्थी   २०१९-२० विद्यार्थी  
 १५१  ते १७५      ४     २०
 १२६ ते १५०  ३९२     ६७७
 १०१ ते १२५  ३,९२४  ५,०१३
 ५१ ते १००  ५५,००१     ४८,६१४
 ० ते ५०  ५१३१०    ४८५२७

पदवीचे काय होणार 
राज्यातील १ लाख १० हजार ६३१ जणांनी एमबीएची प्रवेश परीक्षा दिल्याने हे विद्यार्थी एमबीएला प्रवेश घेऊ शकतात. मात्र, राज्यातील पदवीच्या अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांची कोरोना मुळे अद्याप परीक्षा झालेली नाही. तसेच परीक्षा होणार की ग्रेड देऊन उत्तीर्ण करणार याबाबत गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यामुळे या पात्र विद्यार्थ्यांची धाकधूक कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com