बदल्या ऑनलाइनच व्हाव्यात; शिक्षक संघटनांची अभ्यासगटाकडे मागणी

गजेंद्र बडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पुणे : प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या या पूर्वीप्रमाणेच ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात याव्यात, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी (ता.11) या बदल्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अभ्यासगटाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली. हा एकमेव मुद्दा वगळता अन्य काही त्रुटींबाबत शिक्षक संघटनांमध्ये एकवाक्‍यता नसल्याचे दिसून आल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज दिवसभरात पुणे विभागातील 50 शिक्षक संघटनांनी या अभ्यासगटासमोर बदल्यांमधील त्रुटी आणि त्या दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आपापली मते व्यक्त केली. या सर्व संघटनांच्यावतीने विविध) 50 मुद्दे मांडण्यात आले आहेत. या सर्वांमध्ये केवळ ऑनलाइन बदल्या या एकाच मुद्याबाबत एकवाक्‍यता असल्याचे आढळून आले आहे. मात्र अन्य दहा ते पंधरा मुद्यांबाबत मतभिन्नता दिसून आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुमारस्वामींचा मुलगा अन् काँग्रेस नेत्याची भाची अडकणार लग्नाच्या बेडीत

माजी सैनिकांच्या पत्नी असलेल्या शिक्षिकांचा संवर्ग एकमध्ये समावेश करण्यात यावा, डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील शिक्षिकांना सोयीच्या शाळांवर नियुक्ती मिळावी, दुर्धर आजारांमध्ये गंभीर असलेल्या परंतु बदल्यांसाठी ग्राह्य धरण्यात येत नसलेल्या आणखी काही आजारांचा समावेश करावा, आदींसह विविध 50 मागण्यात करण्यात आल्या आहेत.

भाजपसाठी मोठी बातमी; 'हा' संपूर्ण पक्षच होणार विलीन

ग्रामविकास विभागाने आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन केला आहे. या अभ्यासगटाने सर्व शिक्षक संघटनांची मते जाणून घ्यावीत आणि बदल्यांच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याबाबत सरकारला शिफारशी करण्याचे या अभ्यासगटाला सांगण्यात आलेले आहे.

लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकणार - प्रसाद
दरम्यान, शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील शिक्षक संघटना, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषदांचे पदाधिकारी आणि शिक्षण समित्यांचे सभापती आदींचे म्हणणेही ऐकून घेण्यात येईल. त्यानंतरच सर्वानुमते बदल्यांमधील त्रुटीबाबत सरकारकडे शिफारशी करण्यात येतील, असे या अभ्यासगटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers Association Demand for online Transfers